अमरावती जिल्ह्यातील नामनिर्देशन छाननीअंती 151 उमेदवार कायम,22 अर्ज झाले रद्द.

0
1212
Google search engine
Google search engine

अमरावती जिल्ह्यातील नामनिर्देशन छाननीअंती 151 उमेदवार कायम,22 अर्ज झाले रद्द.

अमरावती:-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी आज विविध मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांकडून करण्यात आली. त्यानुसार धामणगाव रेल्वे 23, बडनेरा 28, अमरावती 25, तिवसा 16, दर्यापूर 20, मेळघाट 10, अचलपूर 15, मोर्शी 14 असे एकूण 151 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरल आहेत.
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात विरेंद्र वाल्मिकराव जगताप (इंडियन नॅशनल काँग्रेस), प्रताप अरुणराव अडसड (भारतीय जनता पार्टी), सविता भिमराव कटकतलवारे (बहूजन समाज पार्टी), उत्तम जंगलू गवई (रिपब्लिकन पक्ष (खोरीपा)), हर्षवर्धन बळीरामजी खोब्रागडे (बहूजन विकास आघाडी), वासूदेव काशीनाथराव चौधरी (जनधिकार पार्टी), निलेश ताराचंद विश्वकर्मा (वंचित बहूजन आघाडी), विशाल उत्तमराव घाडगे (अखिल भारतीय हिंदू महासभा) सुनिता विजय रायबोले (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)), अभिजीत प्रवीण ढेपे (अपक्ष), अवधूत विश्वनाथ सोनवने (अपक्ष), गौरव सुधाकर सव्वालाखे (अपक्ष), चंद्रदिप शंकरराव डोंगरे (अपक्ष), निलम देविदास रंगारकर (अपक्ष), प्रवीण दिनकरराव घुईखेडकर (अपक्ष), प्राविण्य प्रमोदराव देशमुख (अपक्ष), फिरोज खान गफार खान पठान (अपक्ष), मारोती नामदेव सहारे (अपक्ष), रमेश नामदेवराव गजबे (अपक्ष), रामभाऊ गणपत गाडेकर (अपक्ष), शैलेश दिवाकर रोहणकर (अपक्ष), संदिप बाबूलाल मेश्राम (अपक्ष), संदिप विनायकराव धवणे (अपक्ष) अशा 23 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले.
बडनेरा विधानसभा मतदार संघात प्रिती संजय बंड (शिवसेना), विलास देविदास गावंडे (बहूजन समाज पक्ष), संजय हिरामन आठवले (बहूजन विकास आघाडी), प्रवीण रामेश्वराव गाढवे (किसान समाज पार्टी), जीवन चव्हाण (गोंडवाणा गणतंत्र पार्टी), प्रमोद यशवंतराव इंगळे (वंचित बहूजन आघाडी), प्रवीण महादेवराव सरोदे (विकास इंडिया पार्टी), रत्नाकर सुदामराव बनसोड (बहूजन मुक्ती पार्टी), राहूल माणिकराव देशमुख (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)), राहूलभाऊ लक्ष्मणराव मोहोड (बहूजन महापार्टी), संजय देवरावजी महाजन (आर.पी.आय. (खोब्रागडे)), श्रीधर विठोबा गडलिंग (अपक्ष), निलेश पुरुषोत्तम येते (अपक्ष), पुरुषोत्तम उत्तमराव भटकर (अपक्ष), प्रशांत पंजाबराव जाधव (अपक्ष), महेश सुभाषराव देशमुख (अपक्ष), मृदूला किशोर सोनवने (अपक्ष), रवी गंगाधर राणा (अपक्ष), राजू बक्षी जामनेकर (अपक्ष), राणी सुखदेवराव पाटील (अपक्ष), शिला संतोष मेश्राम (अपक्ष), शेख शफी अब्दूल हफिज (अपक्ष), शैलेश अभिमान गवई (अपक्ष), सिद्धार्थ गोंडाणे (अपक्ष), सुरज घरडे (अपक्ष), सुरेश मेश्राम (अपक्ष), सैय्यद इरफान सैय्यद अमीर (अपक्ष), संजय भोंडे (अपक्ष), असे 28 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले
अमरावती विधानसभा मतदार संघात देशमुख मोईन मुफिज (बहूजन समाज पार्टी), डॉ. सुनील पंजाबराव देशमुख (भारतीय जनता पार्टी), सुलभा संजय खोडके (इंडियन नॅशनल काँग्रेस), मो.अलीम पटेल (वंचित बहूजन आघाडी), आठवले संजय हिरामनजी (बहूजन विकास आघाडी), वासुदेव काशिनाथराव चौधरी (जनअधिकार पाटी), धनंजय त्र्यंबकराव देशमुख (संभाजी ब्रिगेड पार्टी), प्रमोद दामोदरराव वाकोडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक), राजू मधुकरराव कलाने (किसान समाज पार्टी), रावसाहेब पुंडलिक गोंडाणे (राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी), राहुल लक्ष्मण मोहोड (बहुजन महा पार्टी), रोशन प्रभाकरराव अर्डक (आम आदमी पाटी), अभिजीत राजेंद्र दळवी (अपक्ष), अशोक पुर्णाजी टेंभरे (अपक्ष), किशोरानंद अजाबराव देशमुख (अपक्ष), गणेश मनोहर पाटील (अपक्ष), नलिनी सचिन तायडे (अपक्ष), पुरुषोत्तम किसन बागडी (अपक्ष), प्रवीण महादेव ऊर्फ मारोती सरोदे (अपक्ष), माधव जळबाजी कारेगावकर (अपक्ष), मेहराज खान पठान (अपक्ष), मोहम्मद एजाज मोहम्मद युनस (अपक्ष), रामक्रिष्ण अडकुजी महाजन (अपक्ष), राहूल माणिकराव देशमुख (अपक्ष), सिंधू विलास इंगळे (अपक्ष) असे 25 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र पात्र ठरले.
तिवसा विधानसभा मतदार संघात अब्दुल नईम अब्दुल जलील (बहुजन समाज पार्टी), ॲड यशोमती चंद्रकांत ठाकुर (इंडियन नॅशनल काँग्रेस), राजेश श्रीराम वानखडे (शिवसेना), दिपक देवराव सरदार (वंचित बहुजन आघाडी), पवन विजय वसू (प्रहार जनशक्ती पार्टी), प्रदीप गंगाधर महाजन (बहुजन मुक्ती पार्टी), भिमराव काशीराव कोरडकर (राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी), सिंधू विलास इंगळे (बहुजन महा पार्टी), संजय गोपाळराव बोडखे (पी.पी.आय.बी. (डी)), दिलीप बाजीराव धनाडे (अपक्ष), नरेंद्र बाबुलालजी कठाणे (अपक्ष), भारत शरद तसरे (अपक्ष), मो. राजीक शे. हसन (अपक्ष), सुरेश मारोती उंदरे (अपक्ष), संजय पंजाब कापडे (अपक्ष), संजय शिवलींग कोल्हे (अपक्ष) असे 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले.
दर्यापूर विधानसभा मतदार संघात गौतम रामदास इंगळे (बहुजन समाज पाटी), बळवंत बसवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), रमेश गणपतराव बुंदिले (भारतीय जनता पार्टी), ॲड चंद्रकांत बोदडे (महाराष्ट्र परिवर्तन सेना), मिनाक्षी सोमेश्वर करवाडे (बहुजन महा पार्टी), रेखा साहेबराव वाकपांजर (वंचित बहुजन आघाडी), विनोद गुलाबराव मेश्राम (आंबेडकरवादी रि.पार्टी), संतोष गोंडूजी कोल्हे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), आशाबानो रशीद खान (अपक्ष), गजानन मोतीराम लवटे (अपक्ष), गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), गोपाल रामकृष्ण चंदन (अपक्ष), दिलीप साहेबराव गवई (अपक्ष), निलेश गजानन राक्षसकर (अपक्ष), ॲड भुषण अनिल खंडारे (अपक्ष), विजय यशवंत विल्हेकर (अपक्ष), सागर ज्ञानेश्वर कलाने (अपक्ष), सिमा रविंद्र सावळे (अपक्ष), सुधाकर दत्तूजी तलवारे (अपक्ष), संजय तुळशीराम पिंजरकर (अपक्ष), असे 20 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र पात्र ठरले.
मेळघाट विधानसभा मतदार संघात केवलराम तुळशीराम काळे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), रमेश सुरेशराव मावस्कर (भारतीय जनता पार्टी), लक्ष्मण शिकारी धांडे (बहूजन समाज पार्टी), उमेश शंकरराव जांभे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)), राजकुमार दयाराम पटेल (प्रहार जनशक्ती पार्टी), अशोक मारोती केदार (अपक्ष), गंगाराम कुंजीलाल जांबेकर (अपक्ष), मन्नालाल खुबीलाल दारसिंबे (अपक्ष), रवी रामू पटेल (अपक्ष), शैलेंद्र विजयराव गावंडे (अपक्ष) असे 10 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र पात्र ठरले.
अचलपूर विधानसभा मतदार संघात अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख (इंडियन नॅशनल काँग्रेस), सुनिता नरेंद्रराव फिसके (शिवसेना), सैय्यद अशपाक सैय्यद अली (बहूजन समाज पार्टी), अब्दूल नाजिम अब्दूल रहूब (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदूल मुस्लिमीन), नंदेश शेषराव अंबाडकर (वंचित बहूजन आघाडी), बच्चू ऊर्फ ओमप्रकाश बाबाराव कडू (प्रहार जनशक्ती पक्ष), डॉ. राजेंद्र रामकृष्ण गवई (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), रोहिदास ऊर्फ प्रेमहरिचंद गजभिये (बहूजन मुक्ती पार्टी), अनुष्का विजय बेलोरकर (अपक्ष), अमोल ऊर्फ अंकूश दयारामजी गोहाड (अपक्ष), अक्षरा रुपेश लहाने (अपक्ष), गिरीधर नथ्थूजी रौराळे (अपक्ष), पुंडलिकराव गजानन खाडे (अपक्ष), रवि गुणवंतराव वानखडे (अपक्ष), राहूल दिनकरराव कडू (अपक्ष) असे 15 उमेदवारांचे नामर्निदेशन पत्र पात्र ठरले.
मोर्शी विधानसभा मतदार संघात डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे (भारतीय जनता पार्टी), राजेंद्र शेषराव भाजीखाये (बहूजन समाज पक्ष), चंद्रकांत वसंतराव कुमरे (गोंडवाणा गणतंत्र पार्टी), देवेंद्र महोदवराव भुयार (स्वाभिमानी पक्ष), महेंद्र उत्तमराव भातकुले (बहूजन मुक्ती पार्टी), विलास संतोष राऊत (पिछडा समाज पार्टी युनायटेड), संजय दिगांबर खासबागे (अपक्ष), गिरीष रंगराव कराळे (अपक्ष), गुणवंत तुकाराम दवंडे (अपक्ष), गोपाल यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), नंदकिशोर बापूरावजी कुयटे (अपक्ष), नंदकुमार हरिराम हिंगवे (अपक्ष), महोदव बस्तीरामजी युवनाथे (अपक्ष), विनायक खजिनराव वाघमारे (अपक्ष), असे 14 उमेदवारांचे नामर्निदेशन पत्र पात्र ठरले.

22 अर्ज बाद

छाननीअंती 22 अर्ज बाद झाले असले तरी त्यातील 2 उमेदवारांनी एकाहून अधिक अर्ज दाखल केल्याने त्यांची उमेदवारी कायम आहे. 20 उमेदवार बाद ठरले आहेत.
अमरावती विधानसभा मतदारसंघात 28 उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांच्या छाननीनंतर तीन अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार जुम्मन चावरे, अविनाश वानखडे, राजेश चांडक यांचे अर्ज बाद झाले. 25 जणांची उमेदवारी कायम आहे.
बडनेरा मतदारसंघात 28 उमेदवारांच्या 38 नामनिर्देशन पत्रांपैकी 2 नामनिर्देशन पत्र बाद झाले असले तरीही उमेदवारांनी एकाहून अधिक अर्ज टाकल्यामुळे 28 उमेदवारांची उमेदवारी कायम आहे.
अचलपूर मतदारसंघात 15 उमेदवारांच्या 24 नामनिर्देशनपत्रांपैकी सर्व अर्ज पात्र ठरून 15 ही उमेदवारांचे अर्ज कायम आहेत.
मोर्शी मतदारसंघात 17 उमेदवारांच्या 22 नामनिर्देशनपत्रांपैकी 3 अर्ज बाद झाले. श्रीमती वसुधा अनिल बोंडे, सय्यद फारूख सय्यद अहमद, परवेज खाँ रऊफ खाँ पठाण यांचे अर्ज बाद झाले. 14 जणांची उमेदवारी कायम आहे.
दर्यापूर मतदारसंघातील 25 उमेदवारांच्या 26 नामनिर्देशन पत्रांपैकी 5 अर्ज रद्द होऊन 20 जणांची उमेदवारी कायम आहे. सूरज पारडे, डॉ. विद्यासागर वानखडे, समित्रा गायकवाड, राहूल बाबणेकर, मनोज मेळे आदींचे अर्ज बाद झाले आहेत.
तिवसा मतदारसंघात 21 उमेदवारांचे 27 नामनिर्देशन पत्रांपैकी 5 अर्ज बाद झाले. मंगेश वहाणे, राजू गोरडे, राहूल उके, प्रशांत गोंडाणे, ज्ञानेश्वर मानकर यांचे अर्ज बाद झाले. 16 जणांची उमेदवारी कायम आहे.
धामणगाव मतदारसंघात 24 उमेदवारांचे 32 अर्जांपैकी पंकज पवार यांचा एक अर्ज बाद होऊन 23 जणांची उमेदवारी कायम आहे.
मेळघाट मतदारसंघात 13 उमेदवारांच्या 15 अर्जांपैकी 4 अर्ज बाद झाले. राजाराम भिलावेकर, राजेश दहिकर, रामकिसन जांभू, अशोक केदार यांचे अर्ज बाद केले. श्री. केदार यांचा एकाहून अधिक अर्ज असल्याने त्यांची उमेदवारी कायम आहे. 10 जणांची उमेदवारी कायम आहे.