अचलपुर विधानसभा आज होणार उमेदवार याचे भाग्य सीलबंद ,2लाख 75 मतदार बाजवणार मतदान चा हक्क,प्रशासन देखील आहे सज्ज

0
846
Google search engine
Google search engine

आज होणार उमेदवार याचे भाग्य सीलबंद ,2लाख 75 मतदार बाजवणार मतदान चा हक्क,प्रशासन देखील आहे सज्ज

चांदुर बाजार :-

अचलपुर विधानसभा निवडणुक साठी आज दिनांक 21 ऑक्टोबर ला सकाळी 7 वाजल्या पासून मतदान ला सुरुवात होणार असून मतदार संघातील जवळपास पावणे तीन लाख मतदार हे  आपलं मतदान चा हक्क बजावणार आहे. यामध्ये पुरुष 142189 तर स्त्री 132397 संख्या आहे. अचलपुर आणि चांदूर बाजार या ठिकाणी 300 मतदान केंद्राची संख्या आहे.

अचलपुर आणि चांदुर बाजार तालुक्यात शहरी भागात 81 आणि 17 असे 98 तर ग्रामीण भागात 32 व 170 एकूण 202 असे मतदान केंद्र आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान केंद्र हे चांदुर बाजार तालुक्यांध्ये आहे.तर चांदुर बाजार येथील जिजामाता महाविद्यालयात मध्ये सखी मतदान केंद्र आहे.सर्वांनी मतदान करण्याचे आव्हान निवडणूक विभाग कडून करण्यात आले आहे .निवडणूक विभाग आणि पोलिस विभाग देखील आज होऊ घातलेल्या मतदान साठी मोठ्या प्रमाणात सज्ज  झाले आहे.

यामध्ये परतवाडा व अचलपूर शहरातील मतदान केंद्रावर निवडणूक विभाग आणि पोलीस यांची   ड्रोन ने नजर   राहणार आहे.तसेच कायदा आणि सुव्यवस्था तसेच परतवाडा अचलपुर शहरातील मुख्य
30 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा ची  निगराणी राहणार आहे.
तसेच अचलपुर विधानसभा निवडणूक मधील 30 मतदान केंद्रांवर होणार वेबकास्टिंग. म्हणजेच संपूर्ण मतदान प्रक्रियेचे होणार live streaming. होणार आहे.तर या होणाऱ्या निवडणूक मध्ये मतदान पथकातील कर्मचारी व राखीव कर्मचारी असे जवळपास दीड हजार संख्याबळ आहे. सुमारे 50 पोलीस अधिकारी व 1000 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात.मतदान पथकांना घेऊन जाणाऱ्या सर्व वाहनांना जीपीएस बसवले गेले होते.तर अचानक कर्मचारी यांच्या प्रकृती बिघडली असताना एक  वैद्यकीय पथक तैनात करणयात आला आहे.