जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड……

0
1020
Google search engine
Google search engine

.ओम पाटील व कु. प्राची टवरे ची जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड

शेगाव – येथील सेंट झविवर इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी ओम श्यामराव पाटील व जिजामाता न प प्राथमिक(आता मुनिसिपल हायस्कूल ) शाळेची विद्यार्थिनी कु प्राची अमोल टवरे यांची 30 व 31 ऑक्टोब रोजी होत असलेल्या विभागीय क्रीडा संकुल गारखेडा औरंगाबाद या ठिकाणी होणाऱ्या राज्य स्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. प्रथम तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत सुयश प्राप्त करून ओम पाटील व कू.प्राची टवरे या विद्यार्थी, विद्यार्थिनीने विभागस्तरा पर्यंत यशस्वी होत त्यांनी आता राज्य स्तरीय शालेय जिमण्यासतीक स्पर्धेत नंबर मिळवला आहे . यामुळे ग. म. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक श्रीकांत दादा पाटील यांनी या दोघांचे अभिनंदन केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी सोमानी क्रीडा विभागाचे प्रमुख जी.एल बावस्कर आणि जिम्नॅस्टिक संघटनेच्या व ग.म स्कूल चा प्राचार्य कविताताई पाटील यांनी सुद्धा यांचे कौतुक केले असे सर्वस्तरातून त्या दोघांचे
कौतुक करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य युवा सेवा संचालनालय मार्फत संतनगरीत प्रथमच संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ओम श्याम पाटील व कु. प्राची अमोल टवरे नी अंडर (14)फॉर टीन मध्ये यश प्राप्त करीत विभागीय स्तर गाठला होता विभागीय स्तरात यशस्वी होत त्यांनी आता राज्य स्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धा मजल मारली आहे.या स्पर्धा दिनांक 30 व 31 अक्तोंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर औरंगाबाद औरंगाबाद येथे संपन्न होत आहे शालेय स्पर्धेत सहभागी होवून यशस्वी होत या दोघांनी जिमण्यास्तिक मध्ये वेगळा ठसा उमटवत आपल्या शाळेचे व संत नगरीचे नाव लौकीक केले आहे.महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालनालय राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा मार्फत प्रथमच संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते गजानन महाराज जिम्नॅस्टिक अकॅडमी चे हे दोन विद्यार्थी ओम शामराव पाटील व कुमारी प्राची टवरे वय वर्षे 14 या वयोगटात त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम स्थान प्राप्त करून विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली अमरावती श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आयोजित विभागीय स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन दाखवत त्यांनी राज्यस्तरावर झेप घेतली पहिल्यांदा ह्या दोन विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक प्रकारात आपल्या जिल्ह्याचे नाव उंचावले आहे अतिशय अवघड प्रकार हा आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक मानला जातो संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सर्व सुविधा देऊन येथील मुले व मुली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा सहभाग घेत आहेत काही काळात स्पर्धेत ऑलम्पिक मध्ये शेगाव चा विद्यार्थी घडेल अशा सुविधा येथे तयार होतांना दिसत आहे दिनांक 30 व 31 ऑक्टोंबर मध्ये आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धेत यशस्वी होतील असा आशावाद जिमनॅस्टिकची प्रशिक्षक राहुल पहुरकर यांनी व्यक्त केला.