पैलवान प्रतिक्षा मुंडे यांची अंतर विद्यापीठातुन हरीयाना साठी निवड

0
1512
Google search engine
Google search engine

परळी — परळी वैजनाथ येथील पैलवान प्रतिक्षा सूर्यकांत मुंडे हिची नुकत्याच झालेल्या निवड चाचणीतून पुणे येथील भारती विद्यापीठातून महिला आंत विद्यापीठासाठी 55 किलो गटातून हरियाणा येथील रोतक याठिकाणी पाच नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या दरम्यान पार पडणाऱ्या भारतातील सर्व विद्यापीठांच्या महिला कुस्ती स्पर्धा होणार आहेत, त्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यातील परळी वै तालुक्यातील मौजे कनेरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सूर्यकांत मुंडे यांची ही कन्या आहे. पैलवान प्रतिक्षा हिने यापुढेही अशी उत्तम कामगिरी केलेली आहे त्याचा अनुभवातुन पुणे विभागातील पुणे पिंपरी-चिंचवड सातारा सोलापूर
या सर्व भागातून प्रथम येण्याचा मान मिळवून भारतातील सर्व विद्यापीठांच्या कुस्ती स्पर्धेसाठी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रवाना होत आहे. ती सध्या आंतरराष्ट्रीय पंच प्राध्यापक श्री दिनेश गुंड सर यांच्या जोग महाराज व्यायाम शाळा या ठिकाणी सराव करत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तिने आतापर्यंत खाशाबा जाधव शालेय स्पर्धा विद्यापीठ स्पर्धा यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे तिचे या निवडीबद्दल नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे साहेब व कुस्तीप्रेमी क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा दिला