पुन्हा निवडणूक झाल्यास त्यांचा खर्च राजकिय पक्षाकडून वसुल करावा.:-सुरज जामठे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
1220
Google search engine
Google search engine

पुन्हा निवडणूक झाल्यास त्यांचा खर्च राजकिय पक्षाकडून वसुल करावा.:-सुरज जामठे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

अमरावती प्रतिनिधी

       नुकतिच सप्टेंबर २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्र व हरियाणा मधे विधानसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या व त्या नुसार दोन्हीही राज्यामध्ये शांतंतेने निवडणूका पार पडल्या व या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुती ला (शिवसेना-भाजपा व इतर मित्रपक्ष) यांना जनतेने  मोठा प्रमाणावर जनाधार देऊन महाराष्ट्र राज्यामधे सत्ता स्थापन करण्यास कौल दिला होता. मात्र राजकीय सत्ता मुळे महा-युतीने सदर राज्यामधे सरकार स्थापन करण्यास प्रतिकुलचा दर्शनवली व त्यानंतर मा. राज्यपालांनी विरोधी पक्षांला सत्ता स्थापन करण्यास आमंत्रित केले व त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती नाट्यमय रित्या राजकीय घडामोडी घडल्या.
पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपति राजवट लागू करण्यात आली. संवैधानिक राष्ट्र असणाऱ्या भारत देशामध्ये दि. १२/११/२०१९ रोजी राजकारणी लोकांच्या मुळे राष्ट्रपति राजवटी सारखा प्रसंग या राज्यातील सामान्या जनतेवर ओढविण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रपति राजवट लागू झाल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात  आहे. पुन्हा एकदा निवडणूकी मुळे या निवडणुकीचा खर्च परत सर्वसामान्य जनतेच्या करामार्फत होणार आहे.

आज शेतकर्यांची पावसामुळे झालेली त्रासदी तसेच युवकांच्या बेरोजगारीची भयान परिस्थिती असुन सुद्धा राजकिय नेत्याच्या लालसेपोटी जर पुन्हा निवडणुका या राज्यामधे होत असेल तर त्याचा आर्थिक बोजा सर्व सामान्य माणसाने का घ्यावा?
त्यामुळे राज्यामधे पुन्हा निवडणूकाचा कार्यक्रम लागल्यास याचा संपूर्ण खर्च राजकिय पक्षाकडून घेण्यात यावा. व उरलेली रक्कम हि देशहितास उपयोगात आणावी. अशी मागणी जामठे यांनी आपल्या निवेदन द्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे.