दिवे घाट मधील दुखापतग्रस्त वारकऱ्यांची श्री भिडे गुरुजींकडून विचारपूस

0
677
Google search engine
Google search engine

 

संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात सामील होण्यासाठी साडेसातशे वर्षा पासुन चालत आलेल्या परंपरे प्रमाणे श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र आळंदी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते.

काल सकाळी सासवड नगरीतील मुक्काम उरकून सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झालेला असताना, दिवे घाट येथे नियंत्रण सुटल्यामुळे जेसीबी थेट पालखी सोहळ्यात घुसला.
या दुर्दैवी घटनेत संत श्रीनामदेव महाराजांचे सतरावे वंशज ह.भ.प. सोपान महाराज नामदास यांचा आणि ह. भ.प. अतुल महाराज आळशी यांना देवाज्ञा झाली व इतर पंधरा वारकरी गंभीर जखमी झाले.

वारकरी संप्रदायावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगी आदरणीय श्री. संभाजीराव भिडे गुरुजींनी आज आत्मीयतेने जखमी वारकरी बंधूंची हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस केली.

याप्रसंगी दिंडी सोहळ्यामध्ये येणाऱ्या समस्यांवर श्री भिडे गुरुजींनी लक्ष घालावे अशी जखमी वारकऱ्यांनी विनंती केली. अशाप्रकारे वारकरी संप्रदायावर कोणतेही संकट आले तरी शिवछत्रपतींचे धारकरी कायम आपल्या सोबत असतील हे आदरणीय श्री भिडे गुरुजींनी कृतीतून दाखवून दिले.