सैन्यभरती पारदर्शकच ◆ दलालांपासून सावध राहण्याचे भरती कार्यालयाचे आवाहन

0
1244
Google search engine
Google search engine

अमरावती :-

नागपूरच्या सैन्य भरती कार्यालयाकडून चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडांगण येथे 1 ते 10 डिसेंबर या कालावधीत भरती मेळावा होत आहे. त्यात कुठेही पैश्यांची देवघेव होत नसून, दलाल व मध्यस्थांपासून सावध राहण्याचे आवाहन कार्यालयाने केले आहे.

सैन्यभरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व निष्पक्ष असते. कुणीही व्यक्ती किंवा दलाल सैन्यात भरती करण्यासाठी पैसे किंवा इतर वस्तूंची मागणी करत असेल तर नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी किंवा (07172) 257698 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.