मोटार सायकलला लाथ मारून ; सव्वा लाख व सोन्याचे दागीने पळवले

0
604
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील लातूर मुंबई पळसप पाटी जवळ कसबे तडवळे येथील पती-पत्नीला मारहाण करून सव्वा लाख रुपये व सोन्या-चांदीचे दागिने घेऊन अज्ञात पाच जण फरार झाले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील तसलीम शेख हे ऊसतोड कामगारांचे मुकदम म्हणून काम पाहतात हे सध्या एस पी शुगर मध्ये मुकदम म्हणून ऊसतोड मजुर ऊसतोडणीसाठी कारखान्याला त्यांच्यामार्फत पुरवतात ऊसतोड कामगारांना चाकूर जवळील दगडेवाडी या गावाला ऊसतोड मजुराला उच्चल पैसे देण्यासाठी पती व पत्नी मिळून तारीख तीन मंगळवारी त्यांच्या पत्नीला सोबत घेऊन मोटारसायकलवर गेले होते परंतु त्या ठिकाणी त्यांचा व्यवहार न जमल्यामुळे कसबे तडवळे येथे परत मोटारसायकलवर येत होते मुरुड जवळ ते आठ ते साडेआठ या दरम्यान आले होते मुरडहुन त्यांच्यामागे दोन मोटरसायकलवर पाच अनोळखी तरुण त्यांचा पाठलाग करत होते परंतु संध्याकाळी साडे आठची वेळ असल्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारचा संशय आला नव्हता ते नेहमीप्रमाणे मोटरसायकल चालवत होते पळसप पाटीच्या पुढे ढोकीच्या दिशेने आल्यावर पाठीमागून एक मोटारसायकल सुरुवातीला आली त्या गाडिवरील अनोळखी चोरट्यांनी शेख यांच्या मोटरसायकल लाथ मारुन चालू गाडी पाडली मोटरसायकल खाली पाडून त्यापैकी दोन चोरट्यांनी त्यांच्या पत्नीला अंधारात ओढत घेऊन जाऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र , झुमके तसेच पायातील चांदीचे पैंजण (चैन ) गळ्याला चाकू लावून काढून घेतले व त्यांच्या जवळ असलेले बचत गटाचे पाच हजार रुपये काढून घेतले.तसलीम शेख यांच्या जवळ सव्वा लाख रुपये लाल रंगाच्या रूमलामध्ये बांधलेले होते त्यांनी हेल्मेट लावले होते त्यापैकी एका चोरट्याने त्यांचे हेल्मेट हिसकावून काढले व त्यांच्या गळ्याला चाकू लावला मरणाच्या भीतीपोटी तसलीम शेख यांनी सव्वा लाख रुपये असलेला रुमाल चोरट्यांच्या स्वाधीन केला.
तसेच तसलीम शेख यांच्या जवळ असलेले 3 चालू मोबाईल वापरात असलेले चोरट्यांनी हिसकावून घेतले पत्नीला बेदम मारहाण केली व जवळ असलेले पैसे व सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. शेख यांच्या जवळ असलेली मोटारसायकल आडवी पडली होती परंतु ती मोटारसायकल एका चोरट्याने अपघातग्रस्त समजून लोकांनी थांबू नये म्हणुन लगेच तात्काळ उचलून उभी केली. त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणार्‍या वाहनधारकांनी त्याकडे लक्ष केले नाही अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी पती पत्नीला मारहाण करून लुटमार केली.
सदर घटनेची माहिती शेख यांनी त्यांच्या भावाला एका रस्त्यावरून येणाऱ्या प्रवासाच्या मोबाईल वरून सांगितली त्यांच्या भावाने गावातील मित्राच्या मदतीने घटनेची माहिती ढोकी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे यांना फोनवर दिली बनसोडे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली सदर घटना ही शिराढोण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे त्यांनी तात्काळ शिराढोण पोलिसांना बोलावून घेतले व पती-पत्नीला त्यांच्या पुढील कारवाईसाठी त्यांच्यासोबत पाठवले. सदर घटनेची तक्रार शिराढोण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे
परंतु अद्यापही शिराढोण पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही सदर घटना ही साडेआठच्या सुमारास घडल्यामुळे शिराढोण पोलिसांना हे मोठे आव्हानच समजावे लागेल. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.हुकमत मुलाणी उस्मानाबाद