फटफटी व ट्रकच्या धडकेत एक ठार

0
470
Google search engine
Google search engine

ट्रक- मोटारसायकल अपघात मोटारसायकल चालकाचा मृत्यु.

पोलीस स्टेशन, ढोकी: माणिक वामनराव भोईनवाड रा. खळी, ता. परभणी यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे चालवून दि. 06.12.2019 रोजी 20.30 वा.सु. मौजे पळसप फाटा येथे ज्ञानेश्वर चांगदेव निकम, वय 36 वर्षे, रा. पळसप हे चालवत असलेल्या मोटारसायकलला धडक दिली. याअपघातात ज्ञानेश्वर निकम हे मयत झाले तर त्यांच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसलेले गणेश उर्फ बाळासाहेब माळी हे जखमी झाले. त्यावेळी ट्रक चालक हे जखमींना औषधोपचाराची सुविधा न पुरविता व अपघाताची खबर पोलीसांना न देता तसाच निघुन गेला. अशा मजकुराच्या चांगदेव विश्वनाथ निकम यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द पोलीस ठाणे, ढोकी येथे गुन्हा दि. 10.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.