पोकलेनच्या बकेटमध्ये अडकून एक जण जागीच ठार

0
468
Google search engine
Google search engine

पोकलेन (JCB) निष्काळजीपणे चालवल्याने एकाचा मृत्यु.

पोलीस स्टेशन, नळदुर्ग: महेबुब रशिद पटेल, वय 36 वर्षे, रा. गुळहाळी हे दि. 10.12.2019 रोजी 16.30 ते 07.00 वा.चे दरम्यान रचना कंन्स्ट्रक्शन शहापुर येथे पोकलेन (JCB) क्र. एम.एच. 25 ए.एल. 4493 च्या बकेटमध्ये उभा राहुन मिक्सर मधील घट्ट झालेला माल काढत होते. त्यावेळी पोकलेन (JCB)च्या अज्ञात चालकाने निष्काळजीपणे पोकलेन (JCB) चालवुन पोकलेन (JCB) बकेट फिरवल्याने बकेट व मिक्सरमध्ये दबुन महेबुब रशिद पटेल हे गंभीर जखमी होवुन त्यांचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या गुंडूपाशा ताजोद्दीन पटेल यांच्या फिर्यादीवरुन पोकलेन (JCB) क्र. एम.एच. 25 ए.एल. 4493 च्या अज्ञात चालकाविरुध्द पोलीस ठाणे, नळदुर्ग येथे गुन्हा दि. 11.12.2019 रोजी नोंदवण्यात आला