चांदूर रेल्वेत आज पं. स. सभापती व उपसभापती पदाकरीता होणार निवडणुक – सभापतीपद ‘नामाप्र’ (ओबीसी) करीता आरक्षित

0
681
Google search engine
Google search engine

सभापती साठी दावेदार असलेल्या तीन महिला

 

चांदूर रेल्वे – (शहजाद खान)

अडीच वर्षासाठी चांदूर रेल्वे पंचायत समितीचे सभापतीपद ‘नामाप्र’ (ओबीसी) करीता आरक्षित असुन सभापती व उपसभापती पदाकरीता आज रविवारी निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत भजापाचे चार महिला सदस्य तर काँग्रेसचे २ पुरूष सदस्य निवडणुक आले असुन दोन्ही पदावर भाजपाच्या महिलांचाच राज राहणार आहे.

आज रविवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या कार्यालयातील सभागृहात कामकाज चालविण्यासाठी प्रथम सभा घेण्यात येणार आहे. यापूर्वी आज रविवारी नामनिर्देशन पत्र सकाळी ११ ते दुपारी १ वाजता पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. तर सभेचे कामकाज दुपारी २ वाजता सुरू झाल्यानंतर दुपारी २ ते २.१० वाजतापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविणे व नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येईल. तर छाननी संपल्यानंतर पंधरा मिनिटे उमेदवारी मागे घेण्याचा वेळ राहील. त्यानंतर उमेदवारी मागे घेतलेल्या व्यक्तीची नावे वाचून दाखविणे व निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची नावे वाचून दाखविण्याचा वेळ उमेदवारी मागे घेण्याची वेळ संपताच त्यानंतर लगेच राहणार आहे. तर आवश्यकता भासल्यास प्रथम सभापती पदाकरिता व त्यानंतर उपसभापती पदाकरिता तत्काळ मतदान घेण्यात येईल. मतदान झाल्यास तात्काळ प्रथम सभापती पदाकरिता व त्यानंतर उपसभापती पदाकरिता मतमोजणी होईल. व शेवटी लगेच प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल. या सभेमध्ये अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार राजेंद्र इंगळे राहणार आहे. तसेच गटविकास अधिकारी सुद्धा सभागृहात हजर राहणार आहे. त्यामुळे आता सभापती, उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.

सभापतीपदी देशमुख ?

पंचायत समिती निवडणुकीत भाजपातर्फे पळसखेड गणातून सरिता शामबाबु देशमुख, आमला विश्वेश्वर गणातून प्रतिभा धनंजय डांगे, घुईखेड गणातून शुभांगी अमोल खंडारे व सातेफळ गणातून श्रध्दा बाबाराव वऱ्हाडे ह्या चार महिला निवडून आल्या आहे. आरक्षण नुसार शुभांगी खंडारे वगळता इतर तीन महिला सभापतीपदासाठी दावेदार आहे. अशातच सभापती पदावर सरिता देखमुख यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु याला भाजपाकडून दुजोरा मिळालेला नाही.