‘महाराष्ट्र अहेड’सह ‘लोकराज्य’च्या हिंदी, गुजराथी, ऊर्दू आवृत्तींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

0
586
Google search engine
Google search engine

‘महाराष्ट्र अहेड’सह ‘लोकराज्य’च्या हिंदी, गुजराथी, ऊर्दू आवृत्तींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘महाराष्ट्र अहेड’सह ‘लोकराज्य’ मासिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2019 च्या हिंदी, गुजराथी आणि ऊर्दू आवृत्तींचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रामगिरी येथे करण्यात आले. यावेळी विभागाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक ( वृत्त व माहिती) सुरेश वांदिले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा शपथविधी कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचा परिचय आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 288 विधानसभा सदस्यांचा थोडक्यात परिचय या मासिकात करून देण्यात आला आहे. याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या विशेष लेखांनी अंक सजले आहेत. गुरूनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर विशेष लेखही समाविष्ट करण्यात आला आहे. हे अंक सर्वत्र उपलब्ध आहेत.

००००