धरण उशाला अन् कोरड घशाला ; कोंडकर पाण्यासाठी हैराण !

0
489
Google search engine
Google search engine

कोंडकर हैराण !

धरण उशाला अन् कोरड घशाला

उस्मानाबाद /प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे नळाला पाणि दोन दिवसाआड येत असल्यामुळे नागरीकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.
याबाबात सविस्तर व्रत्त असे की कोंड गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी तीन ठिकाणी नळयोजनेसाठी विहरी आहेत व तिन पाण्याच्या टाक्या उभारलेल्या आहेत.
यात दोन टाक्या सरकारी दवाखान्या शेजारी आहेत तर एक टाकी नारायण नगरला आहे.परंतु गाव पुढार्यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे नळयोजनेला पाणीपुरवठा होत नाही अशी चर्चा ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहे.
तसेच नळयोजनेसाठी पाईपलाईनवर वाँल बसवलेले आहेत ते ही उघडे असल्यामुळे गटारीचे घाण पाणी त्या वाँलमध्ये जाते व ते पाणी पाईपलाईनमध्ये जात असल्यामुळे नागरीकांच्या जिवाशी बेतणारा हा प्रकार सध्या सुरू आहे.नळातून येणार्या पाण्यात ब्लेचींग पावडरचा थोडाही वापर नसल्यामुळे पाण्याचा घाण वास येत आहे.
बस स्टँडवरील पाईपलाईनमध्ये घाण पाणि साचत असल्यामुळे सकाळी नळाला पाणी येत असताना तर चक्क संडासचे पाणी येत असल्यासारखी दुर्गंधी सर्व परिसरात येत असते.
या सर्व बाबीकडे गाव पुढारी दुर्लक्ष करत आहेत.
विशेष म्हणजे निवळी रसत्यालगत अगदी गावाच्या उशाला असलेला तलाव फुल्ल भरलेला आहे त्याला लागूनच पाणीपुरवठा करणारी विहिर आहे.त्या विहरीतुन जर गावाला पाणी पुरवठा केला तर दररोज नळाला पाणी येऊ शकते असे ग्रामस्थांचे म्हणने आहे.
सध्या गावाला गाव पुढार्यांच्या दुर्लक्षामुळे दोन दिवसाआड पाणी येत आहे. हि परस्थीती सध्या हिवाळ्यात आहे ऊन्हाळ्यात तर नळाला पाणीच येईल का नाही अशी धास्ती ग्रामस्थांनी घेतली आहे.
धरण कोंडच्या उशाला असतानाही जनतेच्या घशाला कोरड पडली आहे असेच म्हणावे लागेल.
या प्रकाराकडे गाव पुढाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन गावाला होणारा दुषीत पाणी पुरवठा शुद्ध करुन होत असलेली गैरसोय थांबवावी अशी मागणी होत आहे.