उस्मानाबाद जिल्ह्यात अपघात,चोरी, अपहरण ,जुगार ,दारु …….

0
642
Google search engine
Google search engine

कार- मोटारसायकल अपघात.

पोलीस स्टेशन, उस्मानाबाद (शहर): टाटा इटॉस कार क्र. एम.एच. 25 आर 4105 च्या अज्ञात चालकाने दि. 22.12.2019 रोजी 11.30 वा. सु. राष्ट्रीय महामार्गावरील अंबादास ढाबा, उस्मानाबाद येथे कार निष्काळजीपणे चालवून नौशादखान नबीखान पठाण रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर हे चालवत असलेल्या मोटारसायकल क्र. एम.एच. 13 डीसी 9853 ला पाठीमागुन जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या डाव्या खांद्याचे हाड मोडुन ते जखमी झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचारकामी न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरुन निघुन गेला आहे. अशा मजकुराच्या नौशादखान पठाण यांच्या फिर्यादीवरुन वरील कारच्या अज्ञात चालकाविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नेांदवण्यात आला आहे.

ट्रॅक्टर- मोटारसायकल अपघातात पुरुष मयत.

पोलीस ठाणे, ढोकी: नागुराव दत्तु सोनटक्के रा. ढोराळा, ता. उस्मानाबाद यांनी ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 5692 हा दि. 22.12.2019 रोजी 18.30 वा. चे पुर्वी येवती शिवारात नितळी ते येवती रोडवर निष्काळजीपणे चालवून सतिश महादेव खोचरे वय 35 वर्षे, रा. येवती, ता.उस्मानाबाद हे चालवत असलेल्या मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 8179 ला समोरुन धडक दिली. या अपघातात सतिश खोचरे मयत झाले असुन मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी भाग्यश्री व मुलगा माधव हे गंभीर जखमी झाले आहेत. अशा मजकुराच्या भाग्यश्री सतिश खोचरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील वाहन चालकाविरुध्द पो.ठा. ढोकी येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मोटारसायकल चोरी, 3 गुन्हे दाखल.

पोलीस ठाणे, ढोकी: तानाजी निवृत्ती गवाड रा. खेड, ता.उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो होन्डा सीडी 100 मोटारसायकल क्र. एम.एच. 13 डी 1645 किं.अं. 25,000/- रु. ची दि. 22.12.2019 रोजी 21.00 ते 23.12.2019 रोजी 05.30 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोट्याविरुध्द पो.ठा. ढोकी येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: सौदागर रोहीदास गरड रा. गरड वस्ती कात्राबाद, ता.परंडा यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 7621 किं.अं. 18,000/- रु. ची दि. 24.12.2019 रोजी 01.00 ते 06.00 वा. सु. त्यांच्या घरासमोरुन अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द पो.ठा. परंडा येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: आश्रुबा बाबुराव जाधव रा. माळकरंजा, ता.उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 7146 किं.अं. 25,000/- रु. ची दि. 24.12.2019 रोजी 16.00 ते 16.30 वा. सु. आठवडी बाजार, ढोकी येथुन अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द पो.ठा. ढोकी येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण, 2 गुन्हे दाखल.

पोलीस ठाणे, शिराढोण: एका अल्पवयीन मुलीचे (नाव-गाव गोपनीय) दि. 23.12.2019 रोजी 18.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द पो.ठा. शिराढोण येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, कळंब: एक अल्पवयीन मुलगी (नाव-गाव गोपनीय) ही दि. 20.12.2019 रोजी 11.00 वा. सु. घरा बाहेर गेली परंतु ती घरी परतली नाही. यावरुन तीचे एका तरुणाने त्याच्या आईच्या सहकार्याने (नाव-गाव गोपनीय) तीचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरुन आई-मुलाविरुध्द पो.ठा. कळंब येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मोबाईल फोन चोरीस.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: अरविंद दौलतराव पाटील रा. इटकळ, ता.तुळजापूर हे दि. 23.12.2019 रोजी 17.30 ते 18.00 वा. सु. खंडोबा मंदीर जवळील आठवडी बाजारात गेले असता 1) अजय कडगंजे 2) अक्षय कडगंजे 3) रेखा कडगंजे 4) यल्लाप्पा कडगंजे सर्व रा. किल्लारी, ता.औसा (ह.मु. धनगरवाडी, ता. तुळजापूर) यांनी अरविंद यांच्या शर्टच्या खिशातील विवो मोबाईल फोन किं.अं. 10,000/- रु. चा काढुन घेउन मोटारसायकलवर पळुन गेले. अशा मजकुराच्या अरविंद पाटील यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

बोकड चोरीस.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (शहर): आप्पासाहेब उत्रेश्वर करवर रा. राघुचीवाडी, ता.उस्मानाबाद हे दि. 24.12.2019 रोजी 15.00 वा. सु. त्यांच्या शेतात काम करत असतांना बांधावर चरत असलेला बोकड 1) आकाश पंडीत भोळे रा. भातंगळी, ता.लातुर 2) बाबा बाबु भोळे रा. हारंगुळ, ता.लातुर या दोघांनी मोटारसायकलवर चोरुन नेला. अशा मजकुराच्या आप्पासाहेब करवर यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

टाटा सुमो निष्काळजीपणे चालवणाऱ्यावर कारवाई.

पोलीस स्टेशन, येरमाळा: संतोष रामलिंग कवडे रा. कळंब हे टाटा सुमो क्र. एम.एच. 25 ए 2264 दि. 24.12.2019 रोजी 17.00 वा. सु. येरमाळा चौरस्ता येथे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन निष्काळजीपणे चालवत असतांना पोलीस ठाणे, येरमाळा यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. येरमाळा येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

तरुणास 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा.

पोलीस स्टेशन, उस्मानाबाद (शहर): अभिजीत अनुराग पेठकर वय 27 वर्षे रा. उंबरे कोठा, उस्मानाबाद यास तदर्थ सत्र न्यायाधीश मा. श्रीमती राय यांनी पो.ठा. गु.र.क्र. 11/2018 पोक्सो कायदा अंतर्गत दोषी ठरवून 10 वर्षे सक्त मजुरी व 2,000/- रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जुगार अड्डयावर छापा.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (शहर): 1) बाबरखान अन्वरखाण पठाण 2) वाजीद इस्माईल शेख 3) मुक्तार शेख तीघे रा. उस्मानाबाद हे दि.24.12.2019 रोजी 15.30 वा. सु. भुई गल्ली, संभाजी चौक उस्मानाबाद येथे कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 1,460/-रु. च्या मालासह पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा., उस्मानाबाद (श.) येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: अजय प्रकाश जेटीथोर रा. भिमनगर, तुळजापूर व अन्य एक पुरुष हे दि.24.12.2019 रोजी 15.35 वा. सु. अंबीका हॉटेल समोर, तुळजापूर येथे कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 3,200/-रु. च्या मालासह स्थानिक गुन्हे शाखा (LCB), उस्मानाबाद यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा., तुळजापूर येथे गुन्हा दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

अवैध मद्य विक्री विरुध्द 3 कारवाया

पोलीस ठाणे, शिराढोण: 1) दशरथ सरदार काळे 2) अविनाश बापु ऐडके 3) गणेश रामा ऐडके तीघे रा. वडगांव, ता. कळंब हे दि. 24.12.2019 रोजी 18.45 ते 20.10 वा.सु. मौजे वडगांव येथे तीन विविध ठिकाणी दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एकत्रीत 30 ली. गावठी दारु किं.अं. 1,900/-रु. चा माल स्वत:च्या कब्जात बाळगला असतांना पोलीस ठाणे, शिराढोण यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पोलीस ठाणे, शिराढोण येथे 3 स्वतंत्र गुन्हे दि. 24.12.2019 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

मोटार वाहन कायदा-नियमांचे उल्लंघन 108 कारवाया.

उस्मानाबाद जिल्हा: दि. 24/12/2019 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व जिल्हा वाहतुक शाखा उस्मानाबाद यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या विविध कलम-नियमांनुसार 108 कारवाया केल्या असुन त्यातुन 17,600 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल करण्यात आले आहे.