आकोट आयटीआय मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
429
Google search engine
Google search engine

अकोट,ता.प्रतिनिधी

आधुनिक काळातील विद्येची सरस्वती सावित्रीबाई फुलेंमुळे मुलींना भारतात ख-या अर्थाने शिक्षणाचा अधिकार मिळाला.त्यांनी मुलींसाठी आशिया खंडातली पहिली शाळा सुरु केली.शिक्षणामुळे मुली भारतात पंतप्रधान व राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या,याचे खरे श्रेय सावित्रीबाई फुलेंना जाते,असे प्रतिपादन आयटीआय मधील मान्यवरांनी केले.

शुक्रवार(ता.तीन)ला दुपारी एक वाजता आयटीआय मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती प्राचार्य प्रकाश खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी झाली.त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटनिदेशक गजानन शिंगोकार होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ निदेशक गोपाल मेतकर उपस्थित होते.मान्यवरांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण केले.या कार्यक्रमात नंदकिशोर वरोकार,सुनिल भवाने,बंडू वानरे,जे.एच.संत,सुनिल लहाने,देवेंद्र वसतकर,गजानन भांबुरकर,बबन मेतकर,कमलेश गजभिये,टी.एन.तायडे,निलेश वाघमारे,सुधिर धर्मे,संतोष तळोकार या निदेशकांसह संजय महतकर,मिलींद खोब्रागडे हे वरिष्ठ