आकोटच्या तेजस मोडोकार व साहिल गणगणेची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत धडक

0
1016
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

भारतीय सॉफ्टबॉल महासंघ व सॉफ्टबॉल ओडीसा च्या संयुक्त विद्यमाने कटक येथे दिनांक ५ ते ९ जानेवारी २०२० दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ३२व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार्‍या महाराष्ट्र सॉफ्टबॉल मुलांच्या संघात आकोट च्या तेजस दिलीप मोडोकार आणि साहिल सुधिर गणगणे यांची वर्णी लागली आहे. सॉफ्टबॉल पंढरी जळगावला होत असलेल्या महाराष्ट्र सबज्युनिअर संघाच्या राष्ट्रीय स्पर्धा पुर्व प्रशिक्षण व सराव शिबीरात सहभागी होण्यासाठी दोघेही रवाना झाले आहेत.
कारंजा लाड येथे नुकत्याच झालेल्या 27 व्या सब ज्युनिअर राज्य स्पर्धेत तेजस मोडोकार सह सेकंड बेस चा उत्तम फिल्डर साहिल गणगणे व चमु ने केलेल्या उत्कृष्ट सॉफ्टबॉल खेळ प्रदर्शना मुळे अकोला जिल्हा संघाने द्वितीय स्थान प्राप्त केले होते. तेजसने या ठिकाणी उत्कृष्ट पीचर म्हणून सन्मान मिळवला होता.
दोघेही आपला सॉफ्टबॉल खेळाचा दैनिक सराव देशपांडे अकॅडमी मधे सुजय कल्पेकर व विकास वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करतात. यावर्षी ‘दास आकोट’ चा तिसरा खेळाडू परीमल धर्मे यानेही छत्तीसगढ येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत (१४ वर्ष मुले) महाराष्ट्र संघात स्थान मिळविले होते. अकोला जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव श्री नाजूकराव पाखले व देशपांडे अकॅडमी च्या संचालिका श्रीमती मंजिरीताई देशपांडे व सौ नूपुर देशपांडे व मानद मुख्य प्रशिक्षक मुकुल देशपांडे यांनीही खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी साठी शुभेच्छा दिल्या आहेत.