*मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचे अनुदान त्वरित वितरित करून कृषिसमृद्धी योजना पुन्हा कार्यान्वित करा.*

0
509
Google search engine
Google search engine

*माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी*

*अमरावती:-*

विदर्भ मराठवाडा मध्ये हवामानातील बदलाचा सामना करण्याकरिता भारतरत्न नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान जागतिक बँक व नाबार्डच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आले होते या अभियानामध्ये यांत्रिकी करण्याकरिता ७५% ते ८०% अनुदान देण्यात येत होते परंतु सध्यास्थिती मध्ये अनुदान वितरण थांबवण्यात आले आहे. अधिक चौकशी केली असता मार्गदर्शक तत्व नव्याने येणार आहेत असे सांगण्यात येत आहे त्याचप्रमाणे अनुदान वितरित करतांना ५ एकरची मर्यादा पूर्वीच रद्द करण्यात आलेली होती परंतु सध्यास्थिती मध्ये भारतरत्न नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियानाणे यांत्रिकी करण्याची अनुदान प्रकिया पूर्णतहा थांबलेली आहे. ह्या योजनेचे अनुदान त्वरित वितरित करण्याची मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे केली आहे.
भारतरत्न नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियानामध्ये शेतमजूर व भूमिहीनांना शेळ्यांचे वाटप करण्याची योजना सुध्दा बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे गरीब भूमिहीन शेतमजूर लोकांना मिळणारा उद्योग हिरावून घेण्यात आलेला आहे करिता गरीब शेतमजूर महिलांना 10 शेळीचे 1 बोकड वाटप करण्याची योजना तातडीने पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेमध्ये आत्महत्याग्रस्त जिल्हे, नक्षलग्रस्त जिल्हे व कायम दुष्काळी तालुक्के मधील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचना करीत बहुभूदारक शेतकऱ्यांना ७५% व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८०% अनुदान मागील शासनाने मंजूर केले व त्याचा शासननिर्णय पण निघाला परंतु सद्यास्थितीत असलेल्या शासनाकडून या अनुदानाची पूर्तता केली जात नाही शेतकऱ्यांना फक्त ४५% व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५% अनुदान करीत पात्र केल्या जात आहे. त्यांच्या हक्काचे ८०% अनुदान अद्याप पर्यंफ देण्यात आलेले नाही तीच बाब आदिवासी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ९०% ठिबक सिंचनाच्या अनुदानाची आहे करीता मा. मुख्यमंत्री व मा. कृषिमंत्री यांनी या बाबीची तातडीने दखल घेऊन भारतरत्न नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान मध्ये यंत्र सामृगीवर असलेल्या ७५% अनुदान वितरण योजना कार्यान्वित करण्यात यावे, भारतरत्न नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियानामध्ये शेतमजूर व भुमीहीनांना शेळीवाटप योजना पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनावर ८०% अनुदान वितरित करण्यात करण्याची विनंती डॉ. अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडे केली आहे.