बच्चू कडू यांच्या गावात साजरा होणार,चार दिवसिय तिरंगा महोत्सव. *२३ते२६जानेवारी दरम्यान, विविध कार्यक्रमांचे आयोजन.

450
जाहिरात

बच्चू कडू यांच्या गावात साजरा होणार,चार दिवसिय तिरंगा महोत्सव.
*२३ते२६जानेवारी दरम्यान, विविध कार्यक्रमांचे आयोजन.

चांदूरबाजार/प्रतिनिधी

तालुक्यातील बेलोरा येथे दरवर्षी प्रजासत्ताक दिनी, तिरंगा महोत्सव साजरा करण्यात येतो.हा महोत्सव विद्यमान राज्यमंत्री,ना.बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून राबविल्या जात आहे.यावर्षीही “तिरंगा महोत्सव २०२०”
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त बेलोरा गावात २३ते २६जानेवारीला, विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी या महोत्सवाचे आयोजन ग्रामपंचायत बेलोरा,तिरंगा उत्सव समिती व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान,यांच्या संयुक्त विद्यमाने करणार्यत आले आहे.
या तिन दिवसीय कार्यक्रमात २३जानेवारीला सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त महीला बचत गटांसाठी, स्पर्धात्मक प्रभाग स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.या साठी बक्षीसही ठेवण्यात आले आहे.यात प्रथम बक्षीस दोन लाख रुपये,व्दितिय बक्षीस एक लाख रुपये, तिसरे बक्षीस ५१ हजार रुपये असे आहे.
२४जानेवारीला “सुंदर माझे घर,सुंदर माझे अंगन”, या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या साठी प्रथम बक्षीस १०हजार रूपये,दुसरे बक्षीस पाच हजार रुपये,तर तिसरे बक्षीस तीन हजार रुपये ठेवण्यात आले आहे.तसेच २५जानेवारीला महिला मेळावा, महिलांसाठी विविध स्पर्धा,शालेय विद्यार्थ्यांन साठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठीही प्रोत्साहनपर बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
२६जानेवारीला ना.बच्चू कडू यांचे हस्ते,ग्रामपंचायत इमारतीवर ध्वजारोहन होईल.तसेच बक्षीस वितरणही त्यांचे हस्ते करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत सरपंच या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.या चार दिवसिय सोहळ्याला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन, महोत्सवाची शोभा वाढवावी.असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
____________________________________________
गांवात एकात्मता राहून गांवाचा सर्वांगिण विकास व्हावा.या विकासात महिला,विद्द्यार्थी यांचाही सहभाग असावा.सर्वच गांवकर्यांना ग्रामविकासाचे महत्व कळावे यासाठी, चार दिवसिय तिरंगा महोत्सवचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.यासाठी ना.कडू यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत,विकासात्मक कार्यासाठी ही सर्व बक्षीसे देण्यात येतात.त्यामुळे नागरिकां मध्ये स्पर्धा निर्माण होऊन,ग्राम विकासाला चालना मिळते.
दिपाली गोंडीकर, सरपंच,बेलोरा.
_____________________________________________

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।