सेदाणी इंग्लिश स्कुलमध्ये आॕडीओ – व्हीज्युअल लॕबचे उद्घाटन

0
610
Google search engine
Google search engine

इंडीयन नेव्ही  आॕफीसर अतुल शेंडे यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आकोटः ता.प्रतिनीधी

शिक्षण क्षेत्रात सतत नवे प्रयोग राबवणाऱ्या लेट. दिवालीबेन सेदाणी इंग्लिश स्कुल व ज्यु.कॉलेजमध्ये नवतंत्रज्ञान असणाऱ्या अॉडीओ व्हीज्युअल लॕबचे उद्घाटन दि.२० जाने.ला मान्यवरांचे हस्ते पार पडले.शुभारंभ प्रसंगी उद्घाटक प्राचार्य डॉ. अंबादास कुलट,नेव्ही अॉफीसर अतुलकुमार शेंडे यांची उपस्थीती लाभली होती.तर प्रमुख पाहुणे म्हणुन सुरेश सेदाणी,प्राचार्य विजय भागवतकर,मुख्याध्यापक प्रशांत मंगळे,यांची तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा सौ.स्मिता सेदाणी होत्या.या अॉडीओ व्हीज्युअल लॕबमुळे विद्यार्थ्यांना विविध सॉफ्टवेअरद्वारा शिक्षण सुविधांचा भांडार खुला झाला आहे.

यावेळी प्रमुख उद्घाटक डॉ.अंबादास कुलट यांनी विद्यार्थ्यांना शाळेतील शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत आपलं भविष्य उज्वल करण्याचा मनोदय व्यक्त केला.तर प्रमुख पाहुणे नौदल अधिकारी अतुलकुमार शेंडे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रउभारणीसाठी सैन्य सेवेतील करीअरच्या संधीबाबत मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांनी डॉ.अब्दुल कलामांसारखे स्वप्न बाळगण्याचे आवाहन देखील केले.तर संस्थाध्यक्षा सौ.स्मिता सेदाणी यांनी विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षणाची ग्वाही दिली.व शिक्षणातुन उज्वल भविष्य घडवण्याबाबत मार्गदर्शन केले.

उपस्थित पाहुण्यांनी यावेळी या लॕबमधील ६५ इंच एलएडी टीव्हीवर शाळेअंतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांचा चलचित्र आढावा घेतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिकच्या मुख्याध्यापक सौ.स्नेहल अभ्यंकर यांनी तर आभार विशाल राठोड यांनी मानलेत. तर यावेळी भावना केदार या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती