रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्य 501 वाहन चालकांची आरोग्य् तपासणी

0
470
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनीधी

स्थानीक अकोट पोलीस स्टेशन येथील सावली सभागृहात रोटरी क्लब अकोट, शेतकरी मोटर्स व पोलीस स्टेशन अकोट शहर यांचे संयुक्त विदयमाने खास वाहनचालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .गेल्या कित्येक वर्षापासुन अकोट शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह एका आगळया वेगळया पद्धतीने साजरा केला जात असतो. गेल्या वर्षी वाहन चालकांचे डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. हया वर्षी सुदधा रस्ता सुरक्षा सप्ताहा अंतर्गत एक महत्वाचा घटक म्हणजे वाहन चालक वाहन चालक जर आरोग्यच्या दृष्टीने तंदुरुस्त् असेल तर निश्चीतच अपघात होणारच नाही कारण् प्रत्येक वाहन चालकावर स्व्त: पेक्षा दुस-यांची फार मोठी जबाबदारी असते त्याअनुशंगाने ऑटो, बस, ट्रॅक्टर, टॅक्सी, लक्झरी बस , मिनी ट्रक, कार चे वाहन चालकांची आरोग्य् तपासणी करण्याचे ठरविण्यात आले होते. हया अनोख्या शिबीरात अकोट शहरातील तथा संपुर्ण तालुक्यातील वाहन चालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

उंची, वजन, ब्लडप्रेशर, व शुगरची तपासणी डॉ. सुरज व्यवहारे व विशाल इंगोले साहेबांनी त्यांची तपासणी करुन पुढील आरोग्य् दायक मार्गदर्शन केले त्यांना मदतीला व्यव्हारे क्रीटीकल केअर सेंटरचे शारुख शहा व स्वपनील सरकटे श्री हॉस्पीटलचे दिपक इंगळे होते. हया असंक्रमणीय आजाराबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी कारण की हया आजाराची माहीती महत्वाचा घटक असलेल्या वाहन चालकांना नसल्यामुळे किंवा निष्काळजीपणा मुळे हा आजार जळतो, आरोग्य् विभागाला असे लक्षात आलेले आहे की जवळपास 80 % मृत्यु हे हया असंर्कमणीय आजारा मुळे होतात व जे लोक मृत्युमुखी पडतात त्यांची वयोमर्यादा ही 40 ते 60 वर्षाची असते. हया शिबीराचे वैशिष्टय् पाहुन अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोषजी महल्ले् स्व्त: उपस्थीत राहुन स्वत:ची त्यासोबत सर्व वाहन चालकांची व पोलीस कर्मचाऱ्यांची पण तपासणी करुण घेतली.

हया शिबीरा करीता खास हिरोमोटोकॉर्प चे ऐरीया सर्व्हीस मॅनेजर नागेंद्र गोधडी, रोड सेफटी ट्रेनर गजानन भटकर उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करता रोटरी क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार ,रोटरी चे, संजयजी बोरोडे, उदधवराव गणगणे,शाम शर्मा, संतोष इस्तापे, शेतकरी मोटर्स कर्मचारी क्रीष्णाजी नाथे,अजिंक्य् तेलगोटे,अनिल खलोकार, अक्षय काळे, शुभम शेगोकार, कौशीक शेगोकार, अजिंक्य नाथे,पियुश लहाने,अविनाश काळे,आशिष काळे, अक्षय सुपासे, धिरज गणगणे, विवेक पिंपळे, प्रदिप पिंजरकर, मुकेश पिंजरकर तसेच रेवती मोटर्स चे विनोदजी कडु, मंगेश चंदन, वैभव काळे पुजा टार्यसचे निलेश इंगळे तसेच पोलीस स्टेशनचे गणेश फोकमारे, रंजीत मेजर, सुरज चिंचोळकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रयत्न केले अशी माहीती अकोट रोटरीचे जनसंपर्क अधीकारी कल्पेश गुलाहे कळवितात.