सेदानी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात

0
743
Google search engine
Google search engine

 

पॕरा कमांडो देवेंद्र पायगन यांच्या हस्ते ध्वजारोहण

आकोटःसंतोष विणके

लेट दिवलीबेन सेदाणी इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सैन्य दलात यशस्वी सेवा देऊन नुकतेच मायभूमीत सुखरूप परतलेले पॕरा कमांडो देवेंद्र पायघन यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.त्यांच्या रूपाने सेदाणी स्कूलमध्ये सैन्य जवानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची अनोखी गौरवशाली परंपरा यावर्षीही कायम ठेवण्यात आली.

यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून भानुभाई सेदाणी संस्था अध्यक्षा सौ स्मिता सेदाणी , सौ नलिनी देवेंद्र पायगन, संस्थापक सदस्य सुरेश सेदाणी शिरीष वंजारा ,सुधीर महाजन ,जीवन चव्हाण प्राचार्य विजय भागवतकर, मुख्याध्यापक प्रशांत मंगळे आदींची उपस्थिती लाभली होती.

ध्वजारोहण सोहळ्यानंतर तिरंग्यास मानवंदना देऊन राष्ट्रगीत पार पडले.यानंतर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विचारांची भाषण सादर केली तर माध्यमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी गीतसंगीतांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

शिक्षकांच्या वतीने पंकज अंबुलकर यांनी आपले विचार मांडलेत. त्या पश्चात पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले तर बाल चिमुकल्यांच्या कलाविष्काराने प्रभावित झालेल्या कमांडो देवेंद्र पायगन यांच्या तर्फे विविध पारितोषिक घोषित करून वितरित करण्यात आली.

तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत तथा विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमील शेख यांनी तर आभार ममता जितकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अविरत परिश्रम