*सहकार नगर ते प्रविण नगर रस्त्यावरील जड वाहतुक बंद करावी – शिवसेनेचे सहाय्यक पोलिस आयुक्त शहर वाहतुक शाखेला निवेदन*

156
जाहिरात

अमरावती :-
नविन कॉटन मार्केट परिसरातील सहकार नगर चौक ते प्रवीण नगर मार्गावरील जड वाहतुक बंद करुन ज्याठिकाणी पोलिस शिपायाची नियुक्त करण्याची स्थानिक शिवसेनेने केली आहे. बुधवारी शिवसेनेचे उपशहरप्रमुख आशिष ठाकरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस आयुक्त शहर वाहतुक शाखा अमरावती यांना निवेदनात ही मागणी करण्यात आली.

या मार्गावर कॉंक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. एका बाजुचा रस्ता सरस्वती नगर पर्यंत झाला आहे. तर दूसर्या बाजूचे काम जेमतेम सुरू झाले आहे. ज्यामूळे एकेरी वाहतुक या मार्गाने सुरु आहे. असे असताना या मार्गावर ट्रकांची जड वाहतुक मोठ्याप्रमाणात चालत आहे. या जड वाहनांमूळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण होत आहे. या मार्गावर आतापर्यंत अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहे. तर काहिंना कायमचे अपंगत्व आले आहे. यापूर्वी अशाच मागणीकरिता शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यामूळे हा रस्ता काही काळ जड वाहतुकीकरीता बंद करण्यात आला होता. यातील बहुतांश ट्रक ट्रान्सपोर्ट नगरकडे सोयीचा मार्ग म्हणून या मार्गाची निवड करतात. वास्तवात या ट्रकांना ट्रान्सपोर्ट नगरात जाण्याकरिता शेगाव नाका, कठोरा नाका, महर्षी शाळेसमोरील रिंगरोड, टॉवर लाईन रोड असे अनेक मार्ग आहेत. ज्या मार्गावर सामान्य वाहतुक कमी असते. त्या तुलनेत एका बाजूस दाट वस्ती असल्याने सहकार नगर चौक ते प्रवीण नगर मार्गावर सतत विद्यार्थी, स्कूल बस, दूचाकी धारक महिला, वृध्द व्यक्ती यांची वर्दळ असते. सोबतच या ठिकाणी वाहतूक पोलिसांचीसुध्दा अनुपस्थिती असते. जड वाहतुक येथील नागरिकांची डोकेदुखी ठरत असून ती तत्काळ बंद करावी अशी मागणी प्रवीण नगर,सरस्वती नगर,भिवापुरकर नगर, महेंद्र कॉलनी, छत्रसाल नगर येथील नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून केली.

अन्यथा आंदोलन करु
वारंवार विनंती करुन पोलिस विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही. या रस्त्यावरील जड ट्रक वाहतुक कायमस्वरूपी बंद करून येथे वाहतुक पोलिसांची नेमणूक करणे अत्यावश्यक झाले आहे.आम्हाला पोलिस विभागाने सहकार्य न केल्यास नाईलाजाने आम्हाला आंदोलनाचा पवित्रा स्विकारावा लागेल असा ईशारा शिवसेना उपशहरप्रमुख आशिष ठाकरे यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे.

 

निवेदन देताना जेष्ठ नागरीक सर्वंश्री चंद्रशेखरजी चव्हाण,अशोकराव बेलोरकर,नारायणसिंह पाटील,सतिशजी अग्रवाल,ज्ञानेश्वरराव ठाकरे, बोरकर फुलवाले,महात्मे काका व युवावर्गात सचिन रहाटे,मनोज वानखडे, संकेत गढवाल,आशिष खेडकर, अक्षय बोबडे,संकेत कावरे,आकाश वऱ्हाडे,शिवम जवंजाळ,ओम राणे,उमेश खोकले,सचिन खेडकर, शुभम तायडे,प्रशांत बुगल, मयूर डांगे,गोविंदा जिजणकर, गौरेश ताथोड, विनोद वाडेकर, वैभव टोकसे,वृषभ कले, मंगेश बावनथडे,तुषार चौधरी, पियुष भटकर,संकेत होले, निखिल राईकवर,अतुल कांकाळे,नीरज गाढवे,अनुराघ वानखडे,अनिकेत खोडके,सागर गिरासे,अविनाश काळे,सह अनेक शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।