आमदार आपल्या दारीच्या माध्यमातून हजारो तक्रारींचा निपटारा – जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी राबविला अभिनव उपक्रम !

1086
जाहिरात

बेनोडा येथे आमदार आपल्या दारी उपक्रमाला मोठा प्रतिसाद !

 

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी :

सर्वसामान्य नागरिकांची महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे आमदार आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून होत आहेत.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या तत्काळ निराकरणासाठी आमदार आपल्या दारी उपक्रमाची सुरुवात आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये पहिल्यांदाच करण्यात आली असून वरुड तालुक्यातील बेनोडा शाहिद येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे आमदार आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला.


यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार , उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले , तहसीलदार विजय सावंत , वरुड पंचायत समिती गट विकास अधिकारी वासुदेव कनाटे , उप विभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते , कृषी अधिकारी उज्वल आगरकर , जी प सदस्य राजेंद्र बहुरूपी , प्रमोद कोहळे , माजी जी प सदस्य श्रीधर सोलव , मोहन अलोने , महेंद्र देशमुख , संजय कानुगो ,  वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार , संदीप खडसे , यांच्यासह शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की,  सर्वसामान्यांचे महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे एकाच ठिकाणी तत्काळ होण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण आमदार आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यापुढे  असाच उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. आमदार आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी किंवा निवेदने स्वीकारून त्या तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत.


आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून आमदार आपल्या दारी उपक्र वरुड तालुक्यातील विविध गावांत राबविण्यात येत आहे. मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात येत असून, वरुड तालुक्यात बेनोडा शाहिद  येथे आयोजित आमदार आपल्या दारी उपक्रमाचा बेनोडा , पाळसोना , मांगोना , धामनधस , माणिकपूर ,नागझिरी , गोरेगाव , जामगाव , तलोटी , बारगाव , खडका , पंढरघाटी  येथील ग्रामस्थांनी लाभ घेतला .


आमदार आपल्या दारी अभियानामध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत अनिता भलावी , पंचशीला वावरे , रोशनी लांडगे , पूजा विरुळकर , वर्षा सातपुते या लाभार्थ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला , अतिक्रमण नियमाकुल करून जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप करण्यात आले , महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत  ३६ महिला बचत गटांना व्यवसायाकरिता ५४ लक्ष रु कर्ज मंजूर करून कर्ज वाटप करण्यात आले .

यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वत: शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या तत्काळ निपटा-याबाबत अधिका-यांना निर्देश दिले.  आमदार देवेंद्र भुयार यांच्या आमदार आपल्या दारी उपक्रमामध्ये अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे आमदार देवेंद्र भुयार व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

श्रावणबाळ , संजय गांधी निराधार योजना , महसूल विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, सिंचन, लघु पाटबंधारे, महावितरण, पुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, कामगार कल्याण, परिवहन विभाग,  आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले . आमदार आपल्या दारी उपक्रमाच्या  ठिकाणी नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा यासह छायाचित्र, झेरॉक्स आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. आधारकार्ड , जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड , पोखरा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना ,यासह विविध विभागाचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आले होते .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।