सुवर्ण विहार येथे उसळला भक्ती सागर

298
जाहिरात

संत नरहरीच्या गजराने दुमदुमली नगरी

अकोटः संतोष विणके

अकोला मार्गावरील सुवर्ण विहार परिसरातील मंदिरामध्ये संत नरहरी महाराजांच्या पुण्यतीथी निमित्त श्रींच्या दर्शनासाठी भक्तांनी एकच गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.शहरात सायंकाळी निघालेल्या शोभायाञेने व श्रींच्या गजराने अकोट नगरी दुमदुमली होती.

संत नरहरी समाज सेवा मंडळातर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतीथी निमित्त स्थानिक अकोला मार्गावरील सुवर्ण विहार परिसरातील मंदिरामध्ये मंगळवारी ११ फेब्रुवारीला पुण्यतीथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये सकाळी नरहरी महाराजांच्या मुर्तीला अभिषेक करण्यात येऊन तिर्थस्थापना देवेंन्द्र रेखाते महाराजांच्या उपस्थीतीत करण्यात आली.त्यानंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला.अंबादास महाराज मानकर यांनी काल्याचे किर्तन केले.त्यानंतर स्व.प्रभाकरराव मोडोकार यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव विजय व राजेश मोडाकार यांनी मंदिराला दिलेल्या सिमेंट बाकड्यांचे मान्यरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.तदनंतर मंडाळाचे अध्यक्ष रविंन्द्र मुंडगावकर यांची अकोला जिल्हा गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्या बद्दल अंबादास महाराज मानकर,अनिल मुंडगावकर व नारायण अनासाने यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला



.त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.सायंकाळी शहरातील मुख्य मार्गावरुन सजविलेल्या रथावर संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेची वाजत-गाजत शोभायाञा काढण्यात आली.शोभायाञेच्या मार्गावर महिलांनी ठिकठिकाणी पाणी शिंपडून रांगोळ्या काढल्या होत्या.मार्गावरील महिला व पुरुषांनी प्रतिमेचे पुजन करुन दर्शन घेतले.शोभायाञे दरम्यान महिलांनी फुगड्यांचे फेर धरले होते;तर भक्तगण भक्तीरसात न्हाऊन थिरकत होते.

समाज बांधवांतर्फे ठिकठिकाणी चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायाञे दरम्यान नरहरी महाराजांवर रचित गितांनी आसमंत दुमदुमला होता.महोत्सव यशस्वीतेकरीता श्री संत नरहरी समाज सेवा मंडळ,अजमिढजी सेवा समिती,आकोट तालुका सराफा-सुवर्णकार संघ, युवक व महिला समिती चे पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतलेत.