३ कोटी ४ लक्ष रुपयांच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे भूमिपूजन  :- मोर्शी वरुड तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेणार — आमदार देवेंद्र भुयार !

0
1148
Google search engine
Google search engine

मोर्शी वरुड तालुक्यातील १२३ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली ! 

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

मोर्शी वरुड तालुक्यात सिंचन प्रकल्पांचा सुकाळ असून विकासाचा दुष्काळ असल्यामुळे मोर्शी वरुड तालुका अनेक वर्षांपासून ड्राय झोन मध्येच अडकला आहे  भीषण दुष्काळाचा सामना मोर्शी वरुड तालुक्यातील नागरिकांना करावा लागत आहे मोर्शी वरुड तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख निर्माण झाली आहे मात्र मोर्शी वरुड तालुक्यात शेतकरी हिताचे अनेक सिंचन प्रकल्प मंजूर असून सुद्धा ते मागील १० वर्षात पूर्णत्वास न गेल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यात सिंचन प्रकल्पांचा सुकाळ असून विकासाचा दुष्काळ असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे . मोर्शी वरुड विधानसभा मतदार संघाचे युवा आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मोर्शी वरुड तालुक्यातील सिंचन प्रकल्प व सिंचनाशी संबंधित समस्या पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून मोर्शी वरुड तालुक्याला ड्राय झोन मुक्त करण्यासाठी  अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन सिंचनाच्या सोई सुविधा उपलब्ध करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले .  मोर्शी वरुड तालुक्यामध्ये सुरु असलेल्या जलसंधारण कामांमुळे आगामी काळामध्ये तालुक्यातील भूजल पातळीमध्ये वाढ होऊन टंचाई दुर होण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले .

मोर्शी वरुड तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांकरीता आमदार देवेंद्र भुयार यांनी ३कोटी ४ लक्ष रुपये मंजूर करून मोर्शी वरुड तालुक्यामध्ये विविध कोल्हापुरी बंधाऱ्यांचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला . वरुड मोर्शी तालुक्यातील  रवाळा येथील कोल्हापुरी बंधारा बांधकाम करणे ७२ लक्ष रुपये हा बंधारा चुडामान नदीवर होणार असून या बंधाऱ्यामध्ये १२७ स.घ. मी. पाणी साठा निर्माण होणार असून या बंधाऱ्याच्या माध्यमातून ४३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . मौज कोपरा येथे कोल्हापुरी बंधारा क्र १ बांधकाम करणे ७७ लक्ष रुपये हा बंधारा पाट नाल्यावर होणार असून या कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये ७६ स घ मी पाणी साठा निर्माण होणार असून या बंधाऱ्याच्या माध्यमातून २६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे .  मौजा मोर्शी येथे कोल्हापुरी बंधारा क्र १ बांधकाम करणे ५५ लक्ष रुपये या कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये ५६ स घ मी पाणीसाठा निर्माण होणार असून या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या माध्यमातून १९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . मौजा मोर्शी अहमदपूर येथे कोल्हापुरी बंधारा क्रमांक २बांधकाम करने १०० लक्ष रुपये या कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये ५६ स घ मी पाणीसाठा निर्माण होणार असून या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या माध्यमातून १९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . या विविध कोल्हापुरी बंधाऱ्याचे भूमिपूजन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाले असून यावेळी मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मेघना मोहन मडघे , जी प सदस्य राजेंद् पाटील  , मोहन मडघे , जी प सदस्य अनिल डबरासे , राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार , पंचायत समिती उप सभापती चंदू अडसपुरे ,  सरपंच आम्रपाली भाजीखये ,  डॉ अरविंद भागवतकर , अशोक देवते ,  भूषण चौधरी , विनू शहा , नामदेव आहाके प्रभाकर काळे आशु आढाउ  रवी वंजारी ,स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका प्रमुख हितेश साबळे , ठाकरे साहेब, उपविभागीय जलसंधारण अधिकारी आहाके साहेब, जलसंधारण अधिकारी यांच्यासह मोर्शी वरुड तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते .