*सामाजिक वनीकरण विभाग मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार ● राज्यमंत्री श्री बच्चू कडू यांचा कडे तक्रार >< दोषींवर फौजदारी कार्यवाही केली जाईल :- राज्यमंत्री श्री बच्चू कडू*

1053
जाहिरात

 

चांदुर बाजार :- बादल डकरे

राज्य सरकार हे सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत वृक्ष लागवड आणि संगोपन चे काम महात्मा गांधी रोजगार हमी योजने मध्ये केले जात आहे.या मध्ये गावातच काम आणि कामप्रमाणे दाम या योजनेचे मुख्य उद्देश आहे.मात्र याला चांदुर बाजार तालुक्यात भ्रष्ट्राचार ची कीड लागली असल्याचे दिसत आहे.यांची तक्रार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कडे करण्यात आली आहे.

तालुक्यातील राजुरा,वणी, घाटलाडकी,रेडवा, चीचकुंभ,या भागातील सामाजिक वनीकरण च्या साइड वर सुधीर वावरे यांच्या घरातील सर्व नातेवाईक यांचे नाव चढवून शासकीय लाखो रुपयांचा अपहार केले असून गंगाधर पांडुरंग मोहोरे ही व्यक्ती अपंग त्यांना बेड वरून उठणे बसने सुद्धा करता येत नसताना त्यांचे नावाचे मस्टर काढण्यात आले आहे.तसेच या सर्व कार्यभार ला खतपाणी घालणाऱ्या अधिकारी यांची सुद्धा चौकशी करून कार्यवाही करणयात या संदर्भात तक्रार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कडे करणयात आली आहे.तर यांची चौकशी करणयात यावी अशी मागणी तक्रार कर्ते निलेश वाटणे यांनी केली आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत 90 दिवस गावातच काम मिळायची मुभा आहे.मात्र तालुक्यातील अनेक सामाजिक वनीकरण च्या साइड वर स्थानिक पातळीवर सरपंच नातेवाईक किंवा त्यांच्या जवळील लोक 90 दिवसाच्या वर झाले असताना देखील काम करीत आहे.राजकीय वार्दंड दाखवून आपला आर्थिक फायदा हा स्थनिक पातळीवर केलं जातं आहे तर याला खतपाणी घालण्याऱ्याची चौकशी करून कार्यवाही होणे आवश्यक आहे.त्यामुळे सामाजिक वनीकरण च्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढत असल्याचे दिसत आहे.तर अधिकारी यांचे सुद्धा या कडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा जनसामान्य मध्ये सुरू आहे.

वणी रेडवा चीचकुंभ घातलाडकी या भागातील सामाजिक वनीकरण च्या साइड वर अपंग आणि आणि ज्या व्यक्तीचे सलून आहे त्याचे पण नावाने मस्टर काढण्यात आले आहे.याची चौकशी करून अधिकारी यांच्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. :-

निलेश वाटणे (तक्रार कर्ते)

सामाजिक वनीकरण च्या कामात जर भ्रष्ट्राचार झाला असेल तर यांची चौकशी करून फौजदारी कारवाई करण्यात येईल. – नामदार श्री बच्चू कडू 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।