आरोग्य उत्तम राखण्यासाठी गायन,वादन,इत्यादी संगीत कलेचे ज्ञान असणे गरजेचे आहे:माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख

0
920
Google search engine
Google search engine


सांगली/ कडेगाव: न्युज:

आज प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवनात कला गुणांना वाव देण्याची गरज आहे. यासाठी शिक्षकांना ज्ञान व आरोग्य उत्तम राखण्यासाठी गायन ,वादन या संगीत कलेचे ज्ञान असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.
लोकनेते संपतराव देशमुख दुध संघ येथे शेळकबाव हायस्कूलचे शिक्षक व संगीत विशारद रमेश माळी यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या विशारद पूर्ण गायन या परिक्षेत स्वरसाज संगीत क्लासचे विद्यार्थी व डोंगराई विकास संस्था संचलित शेळकबाव हायस्कूलचे आदर्श शिक्षक रमेश संपतराव माळी यांनी प्रथम क्रमांकाचे यश संपादित केले.त्यांना मोलाचे मार्गदर्शन गुरुवर्य संगीत विशारद विकास गुरव गोरेगाव यांचे लाभले.

यावेळी देशमुख म्हणाले की , संगीत कला प्रकारांचा दररोज रियाज केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. कला ही सर्वोत्तम मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे.त्याचप्रमाणे मानसिक ताण-तणाव दूर करून मानवी जीवन आरोग्यदायी बनवण्यासाठी संगीत कला साह्यता करते. तसेच रमेश माळी यांनी संगीत कला विशारद पदवी संपादन करून विद्यार्थी व शिक्षक, पालकांना एक आदर्श निर्माण केल्याने संग्रामसिंह देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी डोंगराई संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक सयाजीराव देशमुख, संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सचिव संग्रामसिंह देशमुख यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी कडेगाव मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयवंतराव जाधव ,शेळकबावचे हणमंत दाभोळे, सचिन कदम,संकेत कांबळे,राजू जाधव, कडेपूरचे अर्जुन चव्हाण ,शेळकबाव हायस्कूल शेळकबाव, पंचक्रोशी हायस्कूल उपाळे मायणी व न्यु.इंग्लीश स्कूल कार्वे येथील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी इ.उपस्थित होते.
फोटो.