…. कोरोनाची अफवा ; उस्मानाबातदेत गुन्हा दाखल..

58
जाहिरात

उस्मानाबाद /प्रतिनीधी

कोरोना व्हायरसनं आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. पुण्यात कोरोना व्हायरसचे 2 रुग्ण सापडले आहेत गेल्या दोन दिवसापासून उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला असल्याची बातमी सोशल मिडियात पसरली होती. पण ती फक्त अफवा असल्याची माहिती समोर आलीय.

मराठी वृत्तवाहिनाचा लोगोचा फोटो वापरुन उस्मानाबादमध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला असल्याचा फोटो व्हायरल केला होता. वृत्तवाहिनाचा लोगो असल्यानं लोकांनी या फोटोवर विश्वास ठेवला होता. मात्र या प्रकरणी उस्मानाबादचे शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. अशा अफवावर विश्वास न ठेवता नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन उस्मानाबादचे शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी केले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।