*प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी अखेर मंजूर* *सभापती गोपाल तिरमारे यांनी दिला होता ठिय्या आंदोलनाचा इशारा* *चांदुर बाजार न.प.ला निधी प्राप्त*

*प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी अखेर मंजूर*

*सभापती गोपाल तिरमारे यांनी दिला होता ठिय्या आंदोलनाचा इशारा*

*चांदुर बाजार न.प.ला निधी प्राप्त*

चांदुर बाजार
चांदुर बाजार नगर परिषदेला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलाचे बांधकामासाठी लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानाचा दुसऱ्या हप्त्याचा निधी गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असल्याने त्वरित शासनाने निधी उपलब्ध नकेल्यास जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी म्हाडा अमरावती यांचे कार्यालयासमोर घरकुलांच्या लाभार्थ्यांसह ठिय्या आंदोलनाचा इशारा चांदुर बाजार नगर परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती गोपाल तिरमारे यांनी दिल्या नंतर अखेर रु.१कोटी२०लक्ष निधी नगर परिषदेच्या खात्यामध्ये राज्यशासनाकडून जमा करण्यात आलेला असून ताबडतोब लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची रक्कम प्रदान करण्यात येणार असल्याने अर्धवट घरकुल बांधकामाचा रस्ता आता मोकळा झाला आहे.
चांदुर बाजार नगर परिषदेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण १६७ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्राप्त झालेल्या राज्य शासनाच्या पहिल्या हप्त्यातील रुपये ६६.८० लक्ष अनुदानातून १५७ लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी रुपये चाळीस हजार प्रमाणे रक्कम रुपये ६२लक्ष ८०हजारचे प्रदान करण्यात आल्यानंतर उर्वरित दहा लाभार्थ्यांना लवकरच अनुदानाचे प्रदान करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून १५७ लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे. घरकुलधारकांनी बांधकाम सुरू केल्यानंतर त्यांना पुढील बांधकामा करिता अनुदान मिळावे म्हणून लाभार्थी हे वारंवार नगर परिषद कार्यालयाकडे विनंती करीत असतांना सुद्धा गेल्या आठ महिन्यांपासून अनुदान प्रलंबित असल्याने सर्वच लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम अर्धवट राहिलेले आहे. घरकुल धारकांना दुसऱ्या टप्प्याचा निधी त्वरित उपलब्ध करण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी व म्हाडा कार्यालय अमरावती येथे लाभार्थ्यांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिक्षण व आरोग्य सभापती गोपाल तिरमारे यांनी मुख्यमंत्रयांना दिलेल्या निवेदनातून दिल्या नंतर शासनाने त्याची गंभीर दखल घेऊन चांदूरबाजार नगरपरिषदेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकामासाठी लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदानाचा दुसऱ्या हप्त्याचा निधी रुपये १ कोटी २० लक्ष नगर परिषदेला नुकताच वितरित करण्यात आलेला आहे. लवकरच अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याबाबतची कार्यवाही रीतसर करण्यात येईल तरी दिनांक २३ मार्च २०२० पासून अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालय व म्हाडा कार्यालयासमोर लाभार्थ्यांसह पुकारलेले ठिय्या आंदोलन कृपया मागे घेण्यात यावे व प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे अशी विनंती लेखी पत्राद्वारे सभापती गोपाल तिरमारे यांना चांदुर बाजार न.प. चे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी केली. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अनुदान वितरित होणार असल्याने लाभार्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.