आकोटात जनता कर्फ्यू साठी प्रशासन सज्ज

0
1178
Google search engine
Google search engine

अकोटः संतोष विणके

तंबाखू विक्रेत्यांसह उघड्यावर थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

खाजगी डॉक्टरांची प्रशासनाने घेतली बैठक

कोरोना वायरसच्या आपत्तीशी लढण्यास अकोट तालुक्यातील महसूल पालिका तथा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. 22 मार्च रोजी च्या जनता कर्फ्युसाठी प्रशासन अलर्ट मोडवर असून प्रशासनाच्या वतीने दिवसभर विविध उपाययोजनांबाबत समन्वय बैठकांसह ॲक्शन प्लॅन आखण्यात आला.उद्याच्या जनता कर्फ्यु साठी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना विविध मार्गदर्शक सूचना करण्यात आल्यात.तसेच अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दिनांक 24 पर्यंत लॉक डाऊन घोषित केले आहे.

त्यामुळे नागरिकांनी आपत्तीशी लढण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचं पालन करावं असे आवाहन तहसीलदार राजेश गुरव यांनी केले आहे. लॉक डाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, नागरिकांनी घरातच राहावे,व रस्त्यावर जमाव गर्दी न करण्याची सूचना प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान काल दिवसभर अकोट नगरपालिका व तहसील प्रशासनाने तंबाखूजन्य पदार्थ विक्रेते व उघड्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली.या कारवाईत तंबाखू विक्रेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला तर थुंकणाऱ्यांना प्रत्येकी १५० रु. दंड सोसावा लागला.ही कारवाई तहसिलदार राजेश गुरव व आरोग्य विभागाचे पथकातील रोशन कुमरे,कनिष्ट अभियंता आरोग्य निरिक्षक चंदन चंडालीया,प्रभारी आरोग्य निरि.फारूकअहमद,सत्यनारायण सावरकर,नरेन्द्र धामुनिया,अ.सलिम,संजय घेचोरे,यांनी केली.

खासगी डॉक्टर्सना प्रशासनाच्या सतर्क राहण्याच्या सूचना

अकोट तहसील येथे खाजगी डॉक्टरांना आपत्तीशी लढण्यासाठी मार्गदर्शक उपाययोजनांसह सतर्क राहण्याच्या सूचना विशेष सूचना देण्यात आल्यात.या बैठकीला
तहसिलदार राजेश गुरव डॉ.मीना सिवाल अधिक्षिका ग्रामीण रुग्णालय अकोट,ता. आरोग्य अधिकारी डॉ.तोरणेकर,शहर पोलीस स्टेशन ठाणेदार संतोष महल्ले,अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार श्री.ज्ञानोबा फड,नायब तहसीलदार हरीश गुरव, डॉ.कैलाश जपसरे यांच्यासह निमा संघटनेचे सदस्य हे प्रामुख्याने उपस्थित होते.

निमा संघटनेचा कोरोनाशी लढण्याचा संकल्प..

कोरोनाच्या आपत्तीशी लढण्यासाठी अकोट येथे वैद्यकीय निमा संघटनेने तहसीलदार राजेश गुरव यांना संकल्पपत्र सादर केले.या संकल्पपत्रानुसार
संघटनेचे डॉक्टर्स आपआपल्या वेळेतील दोन तास ग्रामीण रुग्णालय मध्ये पेशंट तपासणीसाठी सहकार्य करतीलनिमा संघटनेच्या या प्रेरणादायी संकल्पामुळे इतरांना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे.या संकल्पपत्रावर निमा संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.