कोरोना च्या गंभीर परिस्थिती मध्ये देखील चांदुर बाजार तालुक्यात अवैध धंदे सुरू,गुटखा आणि दारूची विक्री जोरदार

0
1508
Google search engine
Google search engine

कोरोना च्या गंभीर परिस्थिती मध्ये देखील
चांदुर बाजार तालुक्यात अवैध धंदे सुरू,गुटखा आणि दारूची विक्री जोरदार

चांदुर बाजार:-

संपुर्ण जग कोरोनामुळे त्रस्त असताना चांदुर बाजार तालुक्यातील अनेक ग्रामीण तसेच शहरातील अनेक भागात गुटखा तर दारूची विक्री सुरू आहे.तसेच ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हहदीतील विषरोळी या गावातून पूर्ण माध्यम प्रकल्प च्या मागून अवैध वाळूची तस्करी सुरू आहे.तर शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील गावात अवैध गुटखा तसेच दारू विक्री सुरू आहे.

चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुटखा तसेच दारू विक्री सुरू आहे.तर या आधी या अवैध धंदे करणारे याच्या वर ना पोलिसांच्या कार्यवाही चा परिणाम होत होता आणि आता तर चक्क कोरोना या विषाणू चा देखील काहीच परिणाम होत नसताना दिसून येत आहे.एकच दारूचा ग्लास अनेक जण वापरत असल्याने या विषय गंभीर असून अवैध धंदे वाले त्याचे गांभीर्याने घेत नाही आहे.

तर सकाळी चोरून लपवून गुटखा सप्लायर करून नंतर त्याची वसुली ही केली जात आहे.मात्र ग्रामीण भागात नागरिक याबाबत गंभीर असून मोठ्या प्रमाणावर गुटखा खात आहे आणि तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात किराणा दुकान वर सहजरित्या गुटखा उपलब्ध असल्याने गुटखा खाणारे याचे सुगीचे दिवस आहे.तर याच्या मुळे कोरोना विषाणू ला कसे रोखणार हा प्रश्न आहे.