*अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 10 लाखाची मदत*

473

अमरावती-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाद्वारे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना मदत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस १० लाख रुपये निधीचा धनादेश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सुपूर्द केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनंतराव साबळे, डी.सी.सी. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. सी राठोड, प्रशासन अधिकारी एस. बी. चांदुरकर आदी उपस्थित होते.

जाहिरात