*चिंता वाढवणारी बातमी – अमरावती अपडेट :-एका मयत व्यक्तीसह जिल्ह्यात एकूण पाच पॉझिटिव्ह*

0
11647
Google search engine
Google search engine

 

अमरावती : हाथीपुरा येथील निधन झालेली व्यक्ती, तसेच त्यांच्या संपर्कातील तिघांचे थ्रोट स्वॅब रिपोर्ट यापूर्वीच पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे, याच कुटुंबातील एका ज्येष्ठ महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी रूग्णालयात स्थापित कोविड रूग्णालयात उपचार होत आहेत. त्यानुसार अद्यापपर्यंत प्राप्त थ्रोट स्वॅब चाचणी अहवालांनुसार, जिल्ह्यातील पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या एका मयत व्यक्तीसह पाचवर पोहोचली आहे.

दि. 11.4.2020 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त मार्च 2020 पासून *अद्यापपर्यंतचा* अहवाल

 

थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने : 343

 

त्यापैकी निगेटिव्ह : 262

 

प्रलंबित : 57

 

रिजेक्टेड : 19 (त्यातील 12 नमुने पुन:तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत.)

 

पॉजिटिव्ह रिपोर्ट : 5 एकूण (1 मयत व्यक्ती)