गैर प्रकार करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करणार: तहसिलदार डाॅ.शैलजा पाटील. कडेगाव तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांनी मोफत तांदळाचा लाभ घ्यावा!!

Google search engine
Google search engine

सांगली/ कडेगांव न्युज:
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रशासनाकडून विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर कडेगाव तालुक्यातील 25 हजार पात्र लाभार्थी शिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत मोफत तांदूळ वाटप केले जात आहे. याचा लाभ सर्व पात्र लाभार्थी शिधापत्रिका धारकांनी घ्यावा. तर रास्त भाव दुकानदारांनीही सुरळीत धान्य वाटप करावे जादा पैसे आकारणी केल्यास कडक कारवाई केली जाईल असा सज्जड दम तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
यावेळी बोलताना तहसीलदार डॉ शैलजा पाटील म्हणाल्या , एप्रिल महिनीच्या पाहिल्या आठवड्यात तालुक्यातील 98 टक्के पात्र शिधापत्रीला धारकांना नियमितचे म्हणजे प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू कमी दराने वाटप करण्यात आले आहे. तर आता शासनाच्या वतीने तालुक्यातील 25 हजार पात्र शिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे. दुकानदार यांनी सामाजिक बांधिलकी जपत धान्याचे वाटप करायचे आहे.
पुढे त्या म्हणाल्या , सध्या तालुक्यात धान्याचे वाटप सुरळीत सुरू आहे. ग्राहकांपर्यंत धान्य पोहचत आहे. परंतु काही लोक पुरवठा खाता व प्रशासनास बदनाम करण्याकरिता विनाकारण तक्रारी करीत आहेत. अशा लोकांनी कोणतेही तथ्य नसताना तक्रारी केल्यास खपवून घेतले जाणार नाही. विनाकारण तक्रारी करणाऱ्यावरही कायदेशीर कडक कारवाई केली जाईल. सध्या तालुक्यात धान्य पुरवठा सुरळीत होत आहे.यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. शासनाच्या वतीने वाटप करण्यात येत असलेले मोफत धान्य रेशनिंग दुकानदार मार्फत लोकांपर्यंत पोहचवन्यात येत आहे .याबाबत रास्त भाव धान्य दुकानदार याना योग्य ती दक्षता घेण्याच्या व प्रत्येक लाभार्थी शिधापत्रिका धारकांना धान्य वेळेवर मिळावे याबाबत सूचना दिल्या आहेत. कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई होऊ नये याची दक्षता प्रशासन घेत आहे. शासनाच्या वतीने पात्र लाभार्थी शिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती मोफत 5 किलो तांदूळ वाटप सुरू आहे. शिधापत्रिका धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व वेळेवर धान्य घ्यावे.