जनावरांची भूक भागवणारे कळंब मधील अवलिया तरुण मित्र मंडळ !

0
721
Google search engine
Google search engine


जनावरांची भूक भागवणारे कळंब मधील अवलिया तरुण मित्र मंडळ !


कोरोना संसर्गामुळे अखी व्यवस्थाच उध्वस्त होत चालली आहे.जिथं माणसांनाच खायला काही नाही त्याठिकाणी मुक्या प्राण्यांची काय हाल होत असतील याची कल्पनाच करवत नाही.मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील काही तरुणांनी एकत्र येऊन मुक्या जणावरांची भुक भागवल्यामुळे मुक्या जनावरांना तरुणांचा आधार मिळालाय कळंब येथील तरुणांनी गो करोना ग्रुप स्थापन केलाय या ग्रुपच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांची भूक भागवण्याचं कार्य हाती घेतल आहे. हे तरुण स्वतःच्या खिशातून कळंब शहरातील भटक्या जनावरांना घास भरवतात.कोणी आपल्या घरातून चपाती भाकरी आणतं तर कोणी खिशातल्या पैशातून सुग्रास पशु आहार जनावरांसाठी खरेदी करते. कळंब शहरात भटक्या जनावरांची मोठी संख्या आहे.त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही.चौकाचौकांमध्ये ही जनावरं उपास पोटी बसलेले असतात.कळंब शहरातील हा गो करोना नावाचा शहरातील तरुणांचा ग्रुप या जनावरांची भूक भागवत आहे