*प्रो रेड दरम्यान 4 मोटरसायकल आणि आठ आरोपींना अटक* *95 लिटर हातभट्टी दारू जप्त* *चांदुर बाजार:- प्रतिनिधी*

0
1408
Google search engine
Google search engine

 

*प्रो रेड दरम्यान 4 मोटरसायकल आणि आठ आरोपींना अटक*
*95 लिटर हातभट्टी दारू जप्त*

*चांदुर बाजार:- प्रतिनिधी*

आज दिनांक 17 एप्रिल 2020 वार शुक्रवारी रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब अचलपूर यांचे आदेशान्वये पो.स्टे. शिरजगाव कसबा हद्दीत अवैध दारू संबंधाने विशेष मोहीम राबविण्यात येवून दरम्यान एकुण 4 प्रो. रेड करून 95 लिटर गा.ह.भ. किं.रू. 14250/- सह 4 मो.सा. जप्त करून 8 आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. तर एकूण जप्त माल एकुण किं.रू. 1,34,250/- आहे.

यामध्ये अटक केलेले आरोपी यांचे नावे खालील प्रमाणे आहे.धीरज रमेशराव कराळे, राहुल रामेश्वरराव ठाकरे दो.रा. थुगांव पिंपरी,सागर विजय लोंदे, सुरेंद्र देविदास लोंदे दो.रा. बोरगाव पेठ,पांडुरंग हरीभाऊ सोनार, विजय वि कुरवाडे दो.रा. पिंपरी पुर्णा,योगेश ग ब्राम्हणे, अक्षय एकनाथराव निर्मळे, दो.रा. गोविंदपूर अटक केली.
या मध्ये शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन मध्ये साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2, 3 व 4 ला अनुसरून महाराष्ट्र राज्यासाठी तयार केलेले नियम व महाराष्ट्र COVID-19 उपाययोजना नियम, 2020 चे नियम 11 चे उल्लंघन केले असल्यामुळे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सदर कारवाईमध्ये ठाणेदार शिरजगाव कसबा सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, पोना सुरज बेले, पोना प्रताप, पोना पुरूषोत्तम माकोडे, पोशि अनिल भटकर, योगेश बुंदेले, पोशि राहुल खर्चान यांचा सहभाग होता.