उस्मानाबाद जिल्ह्यातील क्राईम बातम्या……!

0
583
Google search engine
Google search engine




“चोरीस गेलेल्या मोबाईल फोनसह आरोपी ताब्यात.”

स्थानिक गुन्हे शाखा (LCB): बाळासाहेब दत्तु लाकाळ रा. पळसप, ता.उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन कपाटातील रोख 35,000/- रु., तीन मोबाईल फोन, दोन मनगटी घड्याळ एकत्रीत किं.अं 16,800/- रु. च असा एकुण 51,800/- रु. चा माल चोरीस गेल्यावरुन पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 95/2020 भा.द.वि. कलम- 380 अन्वये दाखल आहे.

सदर गुन्हा स्था.गु.शा. च्या पथकाने यापुर्वीच उघडकीस आणला असुन उर्वरीत तपासात स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. शेख यांच्या पथकातील पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- मरलापल्ले यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी- अविनाश दिलीप भोसले रा. पाटोदा फाटा यास दि. 21.04.2020 रोजी ताब्यात घेउन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला विवो मोबाईल फोन (कि.अं.8,000/-) जप्त कला आहे. उर्वरीत तपासकामी त्यास संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात देण्यात आले.



“लॉकडाउन: दि. 20.4.20 रोजी 458 पोलीस कारवायांत 1,42,000/-रु. दंड वसुल.”

उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश झाला आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: रस्ता, बाजार, ईमारती इत्यादी ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर एकुण 258 कारवाया करुन 51,400/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी नाक- तोंड न झाकणे (मास्क न वापरणे): 141 कारवाया करुन 66,500/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: किराणा- भाजी दुकाने, जिवनावश्यक वस्तु दुकाने इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 46 कारवाया करुन 11,900/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)जिवनावश्यक वस्तु दुकाना समोर दर पत्रक न लावणे: किराणा दुकाना समोर दर पत्रक न लावणाऱ्या दुकान चालकांविरुध्द 13 कारवाया करुन 12,200/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

तर आज रोजी याच प्रकरणांत विविध कारवाया सुरु आहेत.

“संचारबंदी काळात, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, दुकाने- आस्थापना उघड्या ठेवल्या 2 गुन्हे दाखल.”

उस्मानाबाद जिल्हा: संजय रामदास जाधव, रा. ईडा, ता. भुम यांनी तोंडास मास्क न बांधल्याबद्दल दि. 20.04.2020 रोजी पोलीसांनी त्यांच्यावर 500/-रु. ची दंडात्मक कारवाई केली होती. तरीही दि.21.04.2020 रोजी 1)संजय जाधव हे स्वत: सोबत पत्नी 2)सोजरबाई जाधव हिच्यासह सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल अशा निष्काळजीपणाचे कृत्य करतांना आढळले. तर मा.जिल्हाधिकारी यांनी किराणा दुकाने चालू ठेवण्याची निश्चित केलेली वेळ 07.00 ते 11.00 वा. पर्यंत असतांनाही मौजे लाखनगाव, ता. वाशी येथे किराणा दुकान उघडे ठेवणारे 3) जयंत आंबादास ढेपे रा. लाखनगाव या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 189, 269 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 21.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.



“लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 56 वाहने जप्त.”

उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्‍तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 20.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर)- 30, नळदुर्ग- 1, शहर वाहतुक शाखा- 25, अशी एकुण 56 वाहने ताब्यात घेतली आहेत.

“जुगार अड्ड्यावर छापे.”

पोलीस ठाणे, भुम: विष्णु साठे, सचिन रामदास पौळ, नामदेव तिकटे, अनिल लेकुरवाळे, सचिन नागनाथ पौळ, दिनेश आडसुळे सर्व रा. पाथ्रुड, ता. भुम हे सर्व दि. 20.04.2020 रोजी मौजे पाथ्रुड येथील शेतात तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम 2,050/- रु. च्या मालासह उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. भुम येथे गुन्हा दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: भारत सोनवणे, आकाश अमृतराव, नितीन रोचकरी, गणेश शिरसठ, गजानन जगताप, शुभम माने, योगेश रोचकरी, संतोष पवार सर्व रा. तुळजापूर हे सर्व दि. 20.04.2020 रोजी तुळजापूर येथील ‘आसरा भक्त निवास’ येथील रुम मध्ये तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्यासह मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 1,20,350/- रु. च्या मालासह उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. तुळजापूर येथे गुन्हा दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: मजरअजी शेख, इक्रमअली नदाफ, अलताफ शेख, संतोष व्हंदरगुंडे, आण्णाराव घोडके, नय्युम शेख, सुनिल बंदीछोडे सर्व रा. बेळंब, ता. उमरगा हे सर्व दि. 20.04.2020 रोजी मौजे बेळंब येथील बिरुदेव मंदीरा जवळील झाडाखाली तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्यासह चार मोटारसायकल, एक मोबाईल फोन व रोख रक्कम 2,900/-रु. (मो.सा. व मोबाईल फोनसह एकुण 1,03,400/-रु.) च्या मालासह पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. मुरुम येथे गुन्हा दि. 21.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.





“अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.”



1) तारचंद्र थावरु पवार रा. होळी, ता. लोहारा हे दि. 20.04.2020 रोजी मौजे पेठसांगवी शिवारातील शेतात अवैध गावठी दारुची निर्मीती करत असतांना गावठी दारु निर्मीतीचा 300 ली. द्रव पदार्थ (साहित्यासह किं.अं. 19,000/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. लोहारा येथे गुन्हा दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

2) छाया बाबु शिंदे रा. लाखनगाव, ता. वाशी या दि. 20.04.2020 रोजी स्वत:च्या राहत्या घरा समोर अवैध गावठी दारुची निर्मीती करत असतांना गावठी दारु निर्मीतीचा 500 ली. द्रव पदार्थ व 65 ली. गावठी दारु (साहित्यासह एकुण किं.अं. 36,200/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळल्या. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. वाशी येथे गुन्हा दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

3) संजय गणपत घोडके रा. पतंगेरोड, उमरगा हे दि. 20.04.2020 रोजी उमरगा येथे एकोंडी रोडलगत एका मो.सा. वर दारुची अवैध वाहतुक करत असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा यांच्या पथकास आढळले. त्याच्या ताब्यातील 100 ली. गावठी दारु (मो.सा. सह किं.अं.53,000/-रु.) जप्त करुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. उमरगा येथे गुन्हा दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

4) विकास प्रकाश कांबळे रा. हंगरगा (नळ) ता. तुळजापूर याने अजित शिंदे (प्रतिक बारचा व्यवस्थापक) व मालक दोघे रा. जळकोट, ता. तुळजापूर यांच्या कडील विदेशी दारुच्या 24 बाटल्या (किं.अं.9,600/-रु.) अवैधपणे घेउन दि. 20.04.2020 रोजी मौजे हंगरगा (नळ) येथील स्वत:च्या घरा समोर त्याचा चोरटा विक्री व्यवसाय करत असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर यांच्या पथकास आढळला. यावरुन संबंधीतांविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे गुन्हा दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.





“मोटार वाहन कायदा-नियमांचे उल्लंघन 364 कारवाया.”

उस्मानाबाद जिल्हा: दि. 20/04/2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुध्द मोटार वाहन कायदा-विविध कलम-नियमांनुसार 364 कारवाया केल्या असुन त्यातुन 74,900 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल करण्यात आले आहे.

“पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल.”

पोलीस ठाणे उमरगा: लॉकडाउन काळात दि. 20.04.2020 रोजी 11.00 वा. सु. अशोक चौक, उमरगा येथे कांचन कुंभार या महिला पोलीस कर्मचारी सहका-यांसह बंदोबस्तास होत्या. यावेळी वाजीद मुक्तारमियाँ शेख रा. इंगळे प्लॉट, उमरगा हा नाका- तोंडास मास्क न लावता स्कुटर क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 8705 वर तेथे आला. त्यास मास्क न लावता बाहेर न फिरण्या बाबत कांचन कुंभार यांनी हटकले असता त्याने त्‍यांना विरोध करुन, शिवीगाळ करुन मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर धावून आला. अशा प्रकारे त्याने पोलीसांच्या (लोकसेवकाच्या) शासकीय कर्तव्यात जाणीव पुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन त्याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 353, 509, 506, 188, 186, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.



“मारहाण, 3 गुन्हे दाखल.”

पोलीस ठाणे, वाशी: दि. 20.04.2020 रोजी 11.20 ते 19.30 वा. चे दरम्यान पांढरेवाडी, ता.भुम येथे रावसाहेब आनंदराव हुंबे व अन्य 12 सहकारी यांचा शेतजमीनीच्या कारणावरुन भाऊसाहेब जिवन हुंबे व अन्य 12 व्यक्ती यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी बेकायदेशीर जमाव जमवून परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, फावडे, काठीने, दगड- विटाने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. वाशी येथे दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, आनंदनगर: तुकाराम कदम, वर्षा कदम, प्रतिक कदम तीघे रा. शाहुनगर, उस्मानाबाद यांनी आपल्या मुलाला दमदाटी केल्याच्या राग मनात धरुन कॉलनीतीलच बबीता बिभीषण गव्हाणे यांना दि. 17.04.2020 रोजी 18.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोर शिवीगाळ करुन, धक्काबुक्की केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात बबीता गव्हाणे यांचा हात फॅक्चर झाला आहे. अशा मजकुराच्या बबीता गव्हाणे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

“चोरी.”

पोलीस ठाणे, उमरगा: मौजे तुरोरी, ता. उमरगा येथील ‘राज बियर बार’ च्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 20.04.2020 रोजी मध्यरात्री तोडून आत मधील वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी दारुचे 50 बॉक्स (एकुण किं.अं. 4,00,000/-रु.) चोरुन नेले आहेत.

तर, त्याच दिवशी मौजे माडज, ता. उमरगा येथील हॉटेल & बियर शॉपी च्या खिडकीतून आत प्रवेश करुन बियर शॉपीच्या गुदामाचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून गुदामातील वेगवेगळ्या कपनीच्या विदेशी दारुच्या 786 बाटल्या (एकुण किं.अं. 1,02,542/-रु.) चोरुन नेल्या आहेत. अशा मजकुराच्या बियर बार मालक अनुक्रमे- पृथ्वीराज प्रदीप जाधव रा. तुरोरी, ता. उमरगा व प्रशांत राजेंद्र गायकवाड रा. माडज, ता. उमरगा यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द पो.ठा. उमरगा येथे स्वतंत्र 2 गुन्हे दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.