लग्नाचा खर्च टाळून नवदांपत्याकडुन कोरोनाग्रस्तासाठी 11 हजार 100 रुपयाचा निधी !

0
1173
Google search engine
Google search engine

लग्नाचा खर्च टाळून नवदांपत्याकडुन
कोरोनाग्रस्तासाठी 11 हजार 100 रुपयाचा निधी

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद, (दि २१ ) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील परमेश्वर भारत जाधव व राजश्री वामन शेटे या नवदांपत्यांनी लग्न कार्यातील अनावश्यक खर्च टाळून, सामाजिक अंतर व इतर सर्व नियम पाळून आई-वडील यांच्या उपस्थितीत घरीच लग्नकार्य केले आहे.

हे दोघेही उच्चशिक्षित असून कोरोनाग्रस्तासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी 11 हजार 100 रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला.