निवडणूकात पोत्यांने पैसे उधळणार्या पुढार्यांचे हात,कोरोना संकटात…गेले कुठे ?

0
599
Google search engine
Google search engine


निवडणूकात पोत्यांने पैसे उधळणार्या पुढार्यांचे हात,कोरोना संकटात…गेले कुठे ?


हुकमत मुलाणी / उस्मानाबाद


आज देशावर कोरोनाचे भयानक संकट कोसळले आहे.कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी, देश २५मार्च पासून ३मे पर्यंत लाॅकडाऊन झाला आहे. सध्या सर्वञ संचारबंदी आहे.यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक खेडेगावातील लाखो मजूरांची पोटबंदी झाली आहे .शेतकर्यांच्या फळांच्या बागा अवकाळी पावसाने झोडपल्या आहेत.जिल्हा सिमा बंद असल्याने व मार्केटला वाहातुक नसल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान झाले आहे.
खेडेगावात व शहरात महागाईचा भडका ऊडाला आहे.दुकानदार माल मिळत नाही हे जुजबी कारण देत शेंगदाने १३०रू किलोने व पामतेल पाॅकेट १२०रू ला विकत आहेत. यात शेतमजूर व शेतकरी जसा भरडला जात आहे तसाच सामान्य नोकरदार ही भरडला जातो आहे.आज जिल्ह्यात कोरोनाच्या भितीचे सावट आहे त्यामुळे शहर व गाव,खेड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.याची झळ शहरातील झोपडपट्टी व खेडेगावातील मजूरांना बसत आहे.खेड्यातील ग्रामपंचायत, तालुक्याची पंचायत समिती ,जिल्हा परिषद ,नगर परिषद असो किंवा विधानसभेसाठीची किंवा लोकसभेची निवडणूक असो जेंव्हा निवडणूका असतात तेंव्हा निवडून येण्यासाठी अनेक मात्तबर पुढारी अक्षरशाहा पोत्याने पैसा ओतावा तसे ओततात यात कांही निवडून येतात तरअनेक पराभूत होतात.निवडणूकात वारेमाप वाहानांचा ,दारूंचा,मटनांचा,पार्ट्यांचा खर्च पुढार्याकडून केला जातो निवडणूकात ते आठ दिवस म्हणजे मतदार राजा सांगेल तसेच असतात.होणारा लोकप्रतिनिधी,आमदार खासदार वारंवार मतासाठी गावाला भेटी देत असतात तेंव्हा गावातील लोकांना वाटते …हा पुढारी निवडूण आल्यावर आपल्या गावावर अधिकचे लक्ष देईल.
आज कोरोनाच्या परिस्थितीत अनेकावर उपासमारीची वेळ आली आहे.निवडणूकात पोत्यांने पैसे ओतनारे पुढा—यांचे हात आज कुठे आहेत?असा सवाल ग्रामीण भागातील शेतमजूर,शेतकरी विचारत आहेत.
कांही लोकप्रतिनिधींनी कांही अंशी या परिस्थितीत गरजूंना मदत करण्याचे काम केले आहे.निवडणूकात ज्या पध्दतीने तत्परता मते घेण्यासाठी दाखवली जाते ती संकटसमयी का दाखवली जात नाही हा खरा सवाल आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक पुढारी खुप श्रीमंत आहेत आज त्यांच्याकडून “पोत्याने मदत हवी होती पण ते केवळ एक मास्कची मदत देत आहेत ! म्हणून जिल्ह्यातील गाव,खेड्यातील पारावर सोशलडिटन्स ठेवून चर्चा ऐकायला मिळते आहे.निवडणूकात पोत्याने पैसे खर्च करणारे पुढार्यांचे हात, आज कोरोंनाच्या संकटात गेले कुठे?