महिला समुपदेशन केंद्र मार्फत covid-19 अंतर्गत कौटुंबिक समुपदेशन सुविधा

Google search engine
Google search engine

सांगली/ कडेगांव:न्युज:

महाराष्ट्र राज्य महिला आयोग व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली आणि भारतीय विद्यापीठ ग्रामीण विकास केंद्र सांगली यांचेमार्फत कडेगाव पंचायत समितीकडे सुरू असलेल्या महिला समुपदेशन केंद्राच्या वतीने महिलांच्या साठी विविध उपक्रम राबवले जातात महिलांच्या साठी कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन ,कौटुंबिक कलह महिलांच्या वरली हिंसाचार इत्यादीविषयी समुपदेशनाच्या माध्यमातून सदर महिला समुपदेशन केंद्र कार्यरत आहे.तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विविध विषयावर मार्गदर्शन ,चर्चासत्रे, कार्यशाळा यांचे आयोजन तालुकास्तरावर केली जात आहे.
त्यानुसार आपल्या देशामध्ये आणि विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक दिवस कोरोना सारख्या विषाणूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली अनेक दिवस लॉक डाऊन असल्यामुळे सहाजिकच लोकांना नाईलाजास्तव एकत्र रहावे लागत आहे. त्यामुळे अनेक बाबी समोर आल्या आहेत. आर्थिक चणचण बेरोजगारीमुळे मोठ्याप्रमाणात कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे कुटुंबिक हिंसा

वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी तालुक्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या समुपदेशन केंद्रामार्फत अशा कुटुंबाचे समुपदेशन केले जाणार आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत कार्यरत अंगणवाडी सेविका, बचत गट महिला प्रतिनिधी ,आशा वर्कर्स, तलाठी, ग्रामसेवक किंवा गावचे सरपंच यांच्यामार्फत समुपदेशन केंद्राची खालील नंबर वर संपर्क साधावा.सौ.सायली कुलकर्णी ९९७०१४९५६०,९८२२०४४६५०.

तरी कोव्हीड 19 अंतर्गत वरील समुपदेशनाची काम सुरू आहे सदर कामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सांग ली व गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.