आमदार देवेंद्र भुयार यांनी लेहगाव येथील कापूस खरेदी केंद्राला दिली भेट – मोर्शी वरुड तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा ! 

0
1885
Google search engine
Google search engine

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी वरुड तालुक्यात कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून सर्वच केंद्रावरील सीसीआयची कापूस खरेदी ठप्प पडली होती. यामुळे खरिप हंगामाच्या तोंडवर शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील  केंद्रावर कापूस खरेदी सुरु करण्यात आली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी तालुक्यातील लेहागाव येथील कापूस खरेदी केंद्राला भेट देऊन कापूस खरेदी संदर्भात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेतल्या तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे अश्या सूचना देण्यात आल्या .
सीसीआयच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना हमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून सर्व कापूस खरेदी केंद्र लॉकडाऊन झाल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक राहिला. दीड महिन्यानंतर खरीप हंगाम सुरु होणार असल्याने त्याच्या तयारीकरिता शेतकऱ्यांना पैशीची गरज आहे. कापसाच्या विक्रीअभावी शेतकऱ्यांच्या हातातही पैसा नव्हता. त्यामुळे लवकरात लवकर कापूस खरेदी सुरु व्हावी, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे केली होती  होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील केंद्रावर कापसाची खरेदी सुरु झाली आहे. उन्हाळा वाढत असल्याने कापसाच्या वजनात घट होत आहे. आणखी काही काळ खरेदी बंद असती तर शेतऱ्यांना मोठा फटका बसला असता पण, आता मोर्शी वरुड तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे  यावेळीआमदार देवेंद्र भुयार यांनी लेहगाव येथील जवाहर जिंनिंग प्रेसिंग प्रक्रिया संस्था लेहगाव येथे  सीसीआय तर्फे सुरू असलेल्या कापूस खरेदी केंद्राला दिली भेट. त्यावेळेस रमेश  काळे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी , राजेंद्र  बोहरूपी जि. प. सदस्य , संजय तट्टे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ,  आनंदराव साबळे , राजभाऊ तट्टे सरपंच लेहगाव , राजेंद्र तायवाडे,दिवाकर दुगाने,हितेश साबळे , तसेच कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले .

मोर्शी वरुड तालुक्यातील केंद्रावर अशी घेतली जाते खबरदारी !
कोरोनाचे संकट कायम असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार खरेदी केंद्रावर खबरदारी घेतली जात आहे. कापूस उत्पादकांची नोंदणी केली असून नोंदणीप्रमाणे आदल्या दिवशी फोन करुन दुसऱ्या दिवशी गाड्या बोलावल्या जात आहे. गर्दी टाळण्यासाठी दररोज  गाड्या बोलाविल्या जात असून एक गाडी आत गेल्यावर गाडीसह वाहन चालक व सहकाऱ्याचे सॅनिटायझेशन करतात. त्यानंतर वजन केल्यानंतर कापूस खाली करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध लावण्यासोबतच शेतकऱ्यांचेही समाधान होत आहे.