आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी खेराडे वांगी घटनेची तहसिलदार यांच्या कडून घेतली माहिती

Google search engine
Google search engine

.
.सांगली/ कडेगांव.न्युज
.खेराडे वांगी येथील एक जणास ऱ्हदययाच्या त्रासामुळे मुंबई येथे उपचार घेत असतानाच निधन झाले. या घटनेची तातडीने माहिती आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी कडेगाव तालुक्यातील तहसिलदार डाँ.शैलजा पाटील,तालुका वैधकिय अधिकारी डाँ.अशोक वायदंडे यांच्या कडून घेण्यात आली.
मात्र त्यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रम कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथे करण्यात आला. मात्र निधनानंतर त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणी साठी घेण्यात आले होते. त्याची तपासणी झाली असता.तो कोरोना बाधित निघाला. मात्र त्यांचे अंत्यसंस्कार तो पर्यंत खेराडे वांगी करण्यात आले होते.यावेळी २५ ते ३० जण उपस्थित होते.
यावेळी पत्रकार यांच्याशी बोलताना आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख म्हणाले हिक्षघडलेली घटना अत्यंत दुदैवी तालुक्यात अजून कोणत्याही प्रकारचा घटना घडली नाही।मात्र या गावातील, तालुक्यातील व पै पाहुणे कोणी संपकात आले असतील तर त्यांनी स्वतः हून पुढे येवून आरोग्य अधिकारी व महसूल अधिकारी, पोलीस यांना माहिती देवून प्रसासनास सहकार्य करावे. असे अवाहन त्यांनी यावेळी केले तसेच यामुळे तालुक्यातील लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच शासनाने,आरोग्य विभाग,पोलीस, महसूल विभागाच्या अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करण्याचे अवाहन त्यांनी यावेळी कडेगाव व पलुस तालुक्यातील जनतेला केले.यावेळी कडेगाव तालुका भाजपा तालुका अध्यक्ष धनंजय देशमुख, कडेगाव नगरपंचायत विरोधीपक्षनेते उदयसिंह देशमुख यावेळी उपस्थित होते.

फोटो ओळः खेराडे वांगी येथे घडलेल्या घटनेची माहिती तहसिलदार डाँ.शैलजा पाटील यांच्या कडून घेताना आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख व इतर मान्यवर.