मंथन परिक्षेत कसबे तडवळ्याच्या ३३ विद्यार्थ्यांची गगन भरारी !

0
1263
Google search engine
Google search engine

कसबे तडवळे जि.प.शाळांचे मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत यश समृध्दी म्हेत्रे राज्यात सहावी

विकास उबाळे / कसबे तडवळे

कसबे तडवळे प्रतिनिधी येथील जि. प. आदर्श केंद्रीय प्रा शाळा व जि.प.आदर्श कन्या प्रा शाळा कसबे तडवळे यांचे तब्बल ३२ विद्यार्थी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत गुणवत्ता यादीत आले आहेत. ही राज्यस्तरीय मंथन परीक्षा १९ जानेवारी २०२० रोजी जयहिंद विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती.या परीक्षेमध्ये कसबे तडवळे केंद्रीय प्रा शाळेतील १८ विद्यार्थी तर कन्या शाळेचे १४ विद्यार्थी १ ली ते ७ वी इयत्ता मधून गुणवत्ता यादीत आले आहेत.यात गौरवाची बाब म्हणजे प्रथमच जि.प कन्या शाळेतील कुमारी समृध्दी सत्यवान म्हेत्रे ही दुसरी वर्गातील मुलगी १५० पैकी १४० गुण घेवून राज्याच्या यादीत ६ वी आली आहे. केंद्रीय शाळा व कन्या शाळा या दोन्ही शाळेतील ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत ते विद्यार्थी पुढील प्रमाणेआहेत.पहिली वर्गातून
प्रज्वल जमाले, शंभो करंजकर,समृध्दी टोने केंद्रात प्रथम,भैरव सपाटे केंद्रात दुसरा तर रिद्धी पाटील केंद्रात तिसरी आली आहे.दुसरी वर्गातील राजनंदिनी पाटील केंद्रात प्रथम, अमृता देशमाने द्वितीय,सोहम करंजकर,सम्यक सगरे, गौरवी भगत केंद्रातून तृतीय,तर स्वप्नील विभुते केंद्रात चौथा आला आहे.इयत्ता तिसरी वर्गातील प्रसाद डूमणे प्रथम क्रमांक,
आर्यन क्षिरसागार केंद्रात दुसरा,
मनिष पाटील केंद्रात तिसरा ,
आदित्य माने केंद्रात चौथा आला आहे.चौथी वर्गातील सई माने प्रथम,सिद्धी गवळी द्वितीय, आशिया शेख तृतीय,रोहिणी करंजकर व वेदांत जाधव केंद्रात चौथे आले आहेत.पाचवी वर्गातून
प्रसन्न जमाले केंद्रात पहिला,हर्षदा जाधव व संस्कृती लांडगे द्वितीय,यश गाढवे केंद्रात तिसरा तर सुफिया कोतवाल केंद्रात चौथी आली आहे.सहावी वर्गातून सिद्धी पाटील केंद्रात प्रथम, स्वप्नील होगले व प्रणव करंजकर केंद्रात दुसरे व अथर्व वीर केंद्रात तिसरा आला आहे. सातवी वर्गातून ओम जमाले केंद्रात पहिला तर कौस्तुभ पवार
केंद्रात दुसरा आला आहे.या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे वर्गशिक्षक व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विस्तार अधिकारी श्रीमती किशोरी जोशी,केंद्रप्रमुख प्रमोद अनपट, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश पाटील व प्रभाकर गुळवे, जि.प.आदर्श केंद्रीय प्रा. शाळा मुख्याध्यापिका सौ. सुरेखा टोने , जि.प आदर्श कन्या शाळा मुख्याध्यापक श्री.रहेमान सय्यद व ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी नागरिक यांनी वतीने हार्दिक अभिनंदन केले आहे.