पत्रकार पद्माकर लांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कठोर करवाई करा

0
1296
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची मागणी

अकोट प्रतिनिधी

निंभोरा येथील पत्रकार पद्माकर लांडे यांच्यावर रेती माफियांचे वृत्त प्रकाशित केल्याबद्दल दिनाक 28 एप्रिल रोजी सकाळी अद्न्यात रेतीमाफिया मारेकऱ्याणी जीवघेणा हल्ला केला. या घटनेट सदर पत्रकार हा गंभीर जखमी झाला या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ अकोल्याच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त करुण त्वरित हल्ला करणाऱ्या रेटिमाफियावर कठोर करवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली

.स्थानिक वल्लभनगर जवळ निंभोरा गांव असून पद्माकर लांडे हे अकोला अकोट रोडने आपल्या दुचाकिने जात असतांनाहा हल्ला रेतीमाफियानी केला त्यांच्यावर अचानक अद्न्यात लोकानी हल्ला चढविला या हल्ल्यात पत्रकार लांडे गंभीर जखमी झाले ,त्यानां उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे .या घटनेचा निषेध करुण या प्रकारणाची सखोल चौकशी करुण हल्लेखोर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कठोर करवाई मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शैलेश अलोने ,राज्य सचिव राजेश डांगटे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा अध्यक्ष अहेमद शेख ,जिल्हा कार्याध्यक्ष विट्ठल गुजरकर जिल्हा संघटक प्रकाश आमले ,मा.जिल्हा अध्यक्ष गोपाल नारे ,जिल्हा सचिव सचिन वानखड़े जिल्हा उपाध्यक्ष निरंजन गावंडे,अकोट तालुका उपाध्यक्ष स्वप्निल सरकटे तालुका सचिव गणेश वाकोड़े यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांना निवेदनातून केली आहे..