तालुक्यातील लाभार्थ्यांना होणार 7 कोटीचे अनुदान वाटप

0
854
Google search engine
Google search engine

संजय गांधी निराधार योजना विभागाची तत्पर सेवा

अकोट ता.प्रतिनिधी

अकोट तालुक्यात सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सुमारे दहा हजार लाभार्थी विविध योजनेचा लाभ घेत आहेत.या लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयाने सुमारे ७ कोटी रु.अनुदान विविध बॕकातुन वितरीत होणार आहे.हे अनुदान गरीब निराधारांना लवकर मिळावे यासाठी संजय गांधी विभागाचे नायब तहसिलदार हरीष गुरव व अधिनस्त कर्मचारींनी अथक व तत्पर प्रयत्न केलेत. महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने या लाभार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिल ते जून या तीन महिन्याचे अनुदान एकत्रित देण्याचा निर्णय घेतलाय. तसेच केंद्र सरकारने एप्रिल व मे या दोन महिन्याचे प्रत्येकी पाचशे प्रमाणे एक हजार रुपये इतके अतिरिक्त अनुदान जाहीर केले त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या लाभार्थींना या तीन महिन्याचे रुपये 3000 केंद्रशासनाच्या लाभार्थ्यांना एकूण रुपये चार हजार इतके मानधन मिळण्याची तरतूद केली आहे याबाबत 24एप्रिल 2020 रोजी शासन निर्णय निघाला आहे.

अकोट तालुक्यातील लाभार्थ्यांचे एकूण मानधन सुमारे सात कोटी रुपये झाले होते. तहसील कार्यालयातील कर्मचारी श्री विलास टोलमारे, कु. वंदना अंभोरे, कु.जयश्री हाडोळे यांनी कठोर मेहनत घेऊन केवळ ३ते४ दिवसात ही ३ महिन्यांची बिले बनवून ट्रेझरीत मंजूर करून घेतली. तसेच 30 एप्रिल रोजी तालुक्यातील विविध 36 बँकांमध्ये लाभार्थ्यांच्या संख्येप्रमाणे चेक वाटप पूर्ण केले

कोरोनाच्या पार्श्वभूमी या निराधार वृद्ध लोकांचे लॉकडाऊनमधील हाल पाहून शासनाच्या प्रयत्नांना संजय गांधी योजना विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन एक प्रकारे या लढाईत सामाजिक बांधिलकी जपत आपलाही खारीचा वाटा उचलला आहे. नायब तहसीलदार हरीश गुरव हे बँकेत पोहच करण्यासाठी स्वतः गेले व लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे आव्हान संबंधित बँक व्यवस्थापक यांना केले. येत्या आठवड्यात सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या अनुदान प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले ज्या नियमित लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान न मिळाल्यास संजय गांधी योजना विभागात संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.