*कोरोनाच्या महामारी मुळे एकवीरा स्कुल ची सण २०२०-२१ या नवीन सत्राची शैक्षणिक फी वाढ रद्द*

0
821
Google search engine
Google search engine

Daryapur :-
संपुर्ण दर्यापूर तालुक्यात सर्वांच्या ज्ञात व सुपरिचित असलेली एकविरा स्कूल ऑफ ब्रिल्लीएन्ट्स दर्यापूर , ही शैक्षणिक संस्था परंपरा गत विध्यार्थी व पालक याच्या हिताचं मोल जपत आली आहे , म्हणून या कोरोना च्या महामारी मुळे लोकांची आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाल्यामुळे , संस्थेचे विश्वस्त यांनी हा आपला शैक्षणिक फी वाढ न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे,

एकविरा स्कुल ऑफ ब्रिलियंट्स दर्यापूर *नेहमीच पालक व विद्यार्थी केंद्रीय असतो…*

शाळा हे जाणते की या वर्षी आलेल्या *कोरोना/कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास सर्वांनाच आर्थिक झळ पोहचलेली आहे…*

याच अनुषंगाने शाळेच्या *_कार्यकारिणी सभासदांनी असे ठरविले आहे की येत्या शैक्षणिक सत्र २०२०/२१ मध्ये कुठलेही फि वाढ होणार नाही, व मागील वर्ष २०१९/२० ची वर्गवारी जेवढी फी होती तेवढीच फी २०२०/२१ ला असेल त्यामध्ये कुठलीही वाढ करण्यात येणार नाही…शाळेने घेतेलेल्या ह्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे व शाळेने घेतलेल्या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले…