रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रक्टर जप्त बातमी लिहित पर्यंत कारवाही प्रक्रीया सुरु होती….. घोट परिसरातून ट्रक्टर जप्त

0
628
Google search engine
Google search engine

रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रक्टर जप्त बातमी लिहित पर्यंत कारवाही प्रक्रीया सुरु होती….. घोट परिसरातून ट्रक्टर जप्त

तहसीलदार जगदाळे व नायब तहसीलदार सलामे यांच्या पथकाने हि जप्तीची कार्यवाही केली

सिंदेवाही- तहसीलदार सिंदेवाही यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकासह मरेगाव (तुकुम) जवळील घोट परिसरात सापळा रचून आज (दि. ०६) पहाटे सुमारास घोट परिसरातून रेतीने भरलेले दोन ट्रक्टर जप्त करून दोन्ही ट्रक्टरांना तहसील कार्यालयात जमा केले.

तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक्टर क्रमांक- MH 34 L 8795 हि ट्रक्टर शालिक आनंदराव वासेकर रा. डोंगरगाव ता. मुल यांच्या मालकीची आहे तर वाहन चालक चंद्रशेखर सोनुले हे आहेत.

ट्रक्टर क्रमांक- MH 33 9589 हि ट्रक्टर अरविंद मधुकर भांडारकर रा. राजोली ता. मुल यांच्या मालकीची आहे तर वाहन चालक हिवराज कांबळे हे आहेत.

बातमी लिहित पर्यंत कारवाही प्रक्रीया सुरु होती………विशेष म्हणजे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी मागील काही दिवसात जणूकाही रेती तस्करी करणाऱ्यांचे मुसक्या आवरले आहे त्यांनी मागील काही दिवसात अंदाजे सात ट्रक्टर जप्त केले आहेत त्यामुळे रेती तस्करांचे धाबे दणानले आहे.