अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पुणे पोलीस ग्रामीण पोलीसांनी केली कार्यवाही

Google search engine
Google search engine

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पुणे पोलीस ग्रामीण पोलीसांनी कारवाई करत ताब्यात घेतलं आहे. गाडीच्या पुढील काचेवर अत्यावश्यक सेवेचं स्टीकर लावून राजस्थानी तंबाखूची विक्री केली जात होती. मुंबई आणि पुणे अशी तंबाखूची वाहतूक केली जात होती. ग्रामीण पोलीसांना याची माहिती मिळताचं गाडीवरती कारवाई दोघांना ताब्यात घेतलंय.

त्यांच्याकडून तब्बल 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुणे महामार्गावर सोमाटणे फाटा या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. दोन गाडी चालकांना मावळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलंय. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी ही कारवाई केलीये.