*गर्दी टाळण्यासाठी ‘एक्साईज’कडून ई टोकन सुविधा*

0
847
Google search engine
Google search engine

अमरावती :-  टाळेबंदीतील शिथिलीकरणानंतर
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात मद्यविक्री दुकाने
उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दक्षतेच्या अनुषंगाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ग्रामीण भागात सुरू असलेल्या वाईन शॉप मध्ये होणा-या गर्दी पासुन सुटका व्हावी आणि कोव्हिड -19 या साथिच्या रोगाचा प्रसार होवू नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने इ – टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन विभागाचे जिल्हा अधीक्षक राजेश कावळे यांनी केले आहे.

सदर सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर चालू केलेली आहे.
ज्या ग्राहकांना मद्य खरेदी करायचे आहे अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून इ – टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.

त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणा-या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल. सदर पैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमुद केल्यानंतर ग्राहकास इ – टोकन मिळेल. सदर टोकन आधारे ग्राहक आपल्या सोइच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात, असे उत्पादन शुल्क अधीक्षक श्री. कावळे यांनी सांगितले.