*जिल्हाधिकाऱ्यांकडून धामणगाव रेल्वेला भेट व पाहणी*

0
969
Google search engine
Google search engine

अमरावती-: कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज धामणगाव रेल्वे येथे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली व आढावा घेतला.

कोरोना  प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी धामणगाव रेल्वे येथील कंटेनमेंट झोन, रुग्णालय, निवारा केंद्र व धान्य बाजाराला भेट देऊन पाहणी केली. विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ज्या परिसरात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्हता, तिथेही आता रुग्ण सापडत आहे. ही चिंताजनक स्थिती असून, काटेकोर दक्षतेतूनच त्यावर मात करता येईल. यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. अनावश्यकपणे कुणी फिरताना दिसल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य व पोलीस यंत्रणेला विविध निर्देश दिले. तसेच स्थानिक नागरिकांनी सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.